Bluepadआठवणीतला पाऊस....
Bluepad

आठवणीतला पाऊस....

डॉ अमित.
डॉ अमित.
29th Nov, 2021

Share


आठवणीतला पाऊस....


पाऊस तुमचा आणि माझा
का थोडाच वेगळा असतो
पडतो कधी रिमझिम तर
कधी मुसळाधार बरसतो

वेडाऊन ठेवतो जीव कधी
तर कधी मनही चिंब करतो
जुन्या आठवणींचे ढग बनून
मन पुन्हा पुन्हा गहिवरतो
तो किंवा ती आठवून जो तो
पुन्हा पुन्हा प्रेमात पडतो
ती सध्या काय करते याचा
मनातल्या मनात विचार करतो

असा हा इंद्रधनुषी पाऊस
आठवणींचे रंग मग बरसतो
पाऊस तुमचा आणि माझा
का थोडाच वेगळा असतो
तो येतो अन् जातो कोसळून
चिंब आठवणींचा चिखल करतो
भरलेल्या जखमां तो पुन्हा मग
कधी कधी आणखी खोल करतो
प्रत्येकाच्या आठवणीतला पाऊस
कधी मग कागदावर उतरतो
कवितेच्या रुपात मग तो पुन्हा पु न्हा
मनातल्या मनात बरसतो

पाऊस तुमचा आणि माझा
खरचं का वेगळा असतो
पडतो कधी रिमझिम तर
कधी मुसळाधार बरसतो.

डॉ अमित.

29 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad