Bluepadबुद्ध आणि मि.......
Bluepad

बुद्ध आणि मि.......

सतीश लोंढे
सतीश लोंढे
29th Nov, 2021

Shareबुद्ध मला नेहमी बंद डोळ्यांचा दिसला,
पण बाबासाहेबानी दिलेला बुद्ध तटस्थ पणे उघड़या डोळ्याने पाहनारा आहे...सत्य आणि विज्ञाना च्या कसोटी वर खरा उतरनारा....

आज बुद्ध घराघरात आहे,कोणाच्या झोपड़ित तर कोणाच्या महालात आहे, झोपड़ितला बुद्ध प्रेरणा तर महलातला बुद्ध शोपीस होऊन बसला आहे...

नको तो शोपीस मधला बुद्ध मला,
पाहिजे तो प्रज्ञा शील करुणेची सांगड घालून दीपा सारखा स्वयं प्रकाशित होऊन मार्ग दाखवनारा....मार्गदाता

माझा बुद्ध कधीच कुठल अमिष देत नाही, ना कशाची अपेक्षा करतो, तो सत्या ची कास धरुन जीवन प्रकाशमान करतो.....

आजबाजूला माजलेले अवडम्बर , रक्तपात, धर्मयुद्ध रोकनारा आणि आधुनिक अंगुलीमाला वर विजय मिळवनारा मला बुद्ध पाहिजे...

जग विनाशा कड़े असताना ,दुःख यातना भोगताना, निश्चित मार्ग भटकल्यावर ,जीव नकोसा झाल्यावर ,स्तब्ध एकचित्त होऊन अंधरा मधे कोपरयात ठेवलेल्या बुद्धा कड़े बघून हास्य करा निर्मळ शांति प्राप्त होइल....

✍️✍️✍️✍️✍️
सतीश लोंढे

29 

Share


सतीश लोंढे
Written by
सतीश लोंढे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad