Bluepadशिक्षण आणि संस्कार...जीवनातले मौलिक उपहार.
Bluepad

शिक्षण आणि संस्कार...जीवनातले मौलिक उपहार.

डॉ अमित.
डॉ अमित.
29th Nov, 2021

Share


शिक्षण आणि संस्कार...जीवनातले मौलिक उपहार.


वर्तमानात राहावे म्हणून मी रोजच जमेल तसे वर्तमानपत्र वाचतो...😂😂 पण काही बातम्या वाचल्या की आपण भूतकाळातच बरे होतो असे राहून राहून वाटते....
असे मी का म्हणतोय तुम्हालाही पटेल याचे कारण कळले तर...

नुकतीच एक बातमी वाचण्यात आली. NCRB...म्हणजेच "नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो" च्या सर्वेक्षणानुसार देशातील तुरुंगात असलेल्या कैद्यांपैकी...तब्बल ५२८२ कैदी 'उच्च-शिक्षित' आहेत... सर्वात वर उत्तर प्रदेश त्या खालोखाल महाराष्ट्र आणि त्यानंतर कर्नाटक ही तीन राज्य यात सर्वात वरती आहेत..
कैद्यां मध्ये असलेले हे उच्च शिक्षितांचे प्रमाण नक्कीचं धडकी भरवणारे असे आहे.. हे इथे इतकेच दर्शविते की 'शिक्षणाने माणूस सुसंस्कारी' होतोच असे नाही....
नक्की काय चुकत असेल म्हणून इतके शिक्षण घेवूनही माणूस गुन्हेगारी पार्श्वभूमीकडे वळतो आहे?
आजकालची शिक्षण पद्धती याला कारणीभूत आहे की सभोवतालची परिस्थिती की आणखी दुसरे काही...नक्कीच विचार करण्यासारखी गोष्ट आहे...

शिक्षण...तेंव्हाच सूयोग्य परिणाम घडवते जेंव्हा त्याला सोबत संस्काराची जोड असते...
सुशिक्षित माणूस सुसंस्कारीत असेलच असे नाही.
पूर्वीच्या काळी गुरुकुल पद्धती होती...त्यावेळी शिक्षणासोबत इतरही बऱ्याच विद्या आणि संस्काराची जोड मिळत होती...घरातील वातावरण,वडीलधारी मंडळी, सभोवतालचा समाज हे तीन संस्कार घडवण्यात मोलाची कामगिरी बजावत होते..पण आजकालची विभक्त कुटुंब पद्धती,सोशल मीडिया वर होणारा ( नकोत्या..आणि अतिरंजित ) माहितीचा भडीमार आणि संकुचित होत चाललेलं समाजभान नव्या पिढीवर वेगळीच छाप सोडत आहे.

शिक्षण तुम्हाला क्षणोंक्षणी परिपक्वं करते तर संस्कार तुमच्या जीवनाला योग्य आकार देण्याचा प्रयत्न करते...

शिक्षण आणि संस्कार तसे पाहिले तर एकाच नाण्याच्या दोन बाजू...फक्त एक बाजू वर छपाई असलेले नाणे जसे चलनातून बाद ठरविले जाते तसेच या जीवनाच्या व्यवहारात फक्त शिक्षित,उच्च शिक्षित व्यक्ती संस्कार शून्य असेल तर त्याचेही जीवन भरकटलेले असेल..एका अर्थाने बाद झालेले असेल...

२०२० च्या साक्षरता सर्वेक्षणानुसार..... भारतातील केरळ हे राज्य...९६.२ टक्के साक्षर आहे...पण दुदैवाने केरळ याच राज्यात गुन्ह्याचे प्रमाणही जास्त आहे त्या खालोखाल दिल्ली हे राज्य आहे..ही आकडेवारी नक्की काय दर्शविते...
शिक्षणाचे होत असलेले अध:पतन की शिक्षणा सोबत कमी पडत असलेली संस्कार मूल्ये...
तेंव्हा आज प्रत्येकाने आपल्या भावी पिढीला शिक्षणा सोबत जीवनाच्या रंगमंचावर यशस्वी होण्यासाठी संस्कार मूल्ये...देणे ही आजच्या काळाची गरज बनली आहे.....
आपल्या पुरातन हिंदू धर्म ग्रंथानुसार १६ संस्कार सांगितले गेले आहेत...
संस्कार...या शब्दाची उत्पत्ती अशी आहे.. सम...सम्यक..चांगले आणि कार..म्हणजे कार्य...
अशी कृती जी नेहमी तुम्हाला चांगले कार्य करण्यासच उद्दिपित करेल...हेच तर हवे आहे, ज्यामुळे आपल्याला आपली भावी पिढी नेहमी चांगल्याच कार्यात अग्रेसर राहिलेली दिसेल...त्याला जर उच्च शिक्षणाची जोड मिळाली तर मग सोने पे सुहागाच जणू...
असे संस्काराची जोड असलेले शिक्षण मग तुम्हाला ना कुठलीच अनुचित पायरी चढू देईल... ना तुमचे पाऊल गुन्हेगारीच्या मार्गावर पडेल..ते नेहमी योग्य दिशेनेच, सत्कार्यातच मार्गक्रमण करत राहील....
हीच भावी पिढी भविष्यात मग तुमच्या स्वतःच्या पिढीचे आणि आपल्या भारत देशाचे नाव जगाच्या नकाशावर अधोरेखित करत राहील...
उज्वल करत राहील...🙏

हो की नाही?


डॉ अमित.


23 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad