Bluepadसंवाद
Bluepad

संवाद

Darshan Joshi
Darshan Joshi
8th Oct, 2020

Share

संवाद
असं वाटतं कुटुंबात
व्हावा विकोपाचा वाद
त्यानिमित्तानं होईल तरी
एकमेकांशी सुसंवाद !
मोबाईल बंद पडण्याची
रोज वाट पाहतो आहे
नेटपॅक संपून जाण्याची
स्वप्न सारखी पाहतो आहे
गरीबी पुन्हा यावी आता
चटणी भाकर खाण्यात यावी
कापडाची फाटकी चिंधी
कधी तरी धुण्यात यावी
प्रगती जोरदार केली तरी
एके ठिकाणी पुरे होते
असे वाटते आपले पूर्वीचे
खरेच राहणीमान बरे होते !
कालांतराने नव्या युगाचे
दिसून येतात पडसाद
तेव्हाही शोधता येईल
हरवलेला संवाद !
दर्शन जोशी
संगमनेर

19 

Share


Darshan Joshi
Written by
Darshan Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad