Bluepad2020: सर्वजण कासावीस
Bluepad

2020: सर्वजण कासावीस

S
Shrikant Newarekar
5th Oct, 2020

Share

2019 संपले अन आले वर्ष 2020
ह्या वर्षाने सर्वांचा जीव केला कासावीस
वर्ष सरता सरेना
काही केला जाईना कोरोना
कधी कसा कुठून होतो संपर्क कळेना
माणसाला मोकळेपणा मिळेना
कित्येक पडले बळी
कित्येकांनी मिळवला विजय
पडतो एकच प्रश्न
कोण राहणार अजय
शाळा पडल्या ओस
गरिबांना परवडेना ऑनलाईन चा सोस
'कोरोनाला हरवायचय' पासून 'कोरोनासोबत जगायचंय इथपर्यंतचा हा प्रवास
महामारीतून बाहेर पडण्यासाठी केले जातायतात शक्य ते सारे सायास
लस कधी येणार याचे अनेक कयास
अंतिम उपाय सापडता सापडेना
कोरोनाची भीती मनातून जाता जाईना
सापडावे लवकर यावर उत्तर
पुन्हा बहारावे आनंदी जीवनाचे अत्तर

श्रीकांत नेवरेकर

16 

Share


S
Written by
Shrikant Newarekar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad