Bluepadब्लूपॅड अॅप......जणू ब्लू प्रिंट माझ्या हृदयाची.
Bluepad

ब्लूपॅड अॅप......जणू ब्लू प्रिंट माझ्या हृदयाची.

डॉ अमित.
डॉ अमित.
5th Oct, 2020

Share

ब्लूपॅड अॅप......जणू ब्लू प्रिंट माझ्या हृदयाची.
बस दो मिनिट.... ही टॅग लाईन आहे आपल्या सर्व छोट्या दोस्तांच्या आवडत्या मॅगी नूडल्स ची...तुम्ही म्हणाल या टॅग लाईन चा इथे काय संबंध...म्हटलं तर तसा काहीच नाही आणि म्हटलं तर... फक्त दोन मिनिटांचा..😂😂
तर झाले काय की ब्लूपॅड टीम चा एक मेसेज आला होता...की तुम्हाला हे अॅप कसे वाटले तुमचा अभिप्राय दिलेल्या लिंक वर द्या...यासाठी दोन मिनिटे सुध्दा लागणार नाहीत...वाटलं खरंच का इतके बिझी झालो आपण की हा अभिप्राय ही आपण देऊ शकत नाही...तर तसे बिल्कुल नाही...उलट इतक्या सुंदर अॅप विषयी फक्त दोन मिनिटात काय भावना आपण व्यक्त करणार?ही आपली झटपट मॅगी थोडीच आहे की बस दो मिनिट म्हटले आणि झाली आपली मॅगी...
नाही...एकशे वीस सेकंद..किंवा दोन मिनिटात अश्या अॅप बद्दल लिहायचे ज्या अॅप ने माझ्या सारख्या नवं लेखकाला वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचण्याचा जणू राजमार्गच दिला...माझ्या मनाच्या भावना वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचवण्याचं एक हक्काचं व्यासपीठ दिलं..तसे तुम्ही सर्व वाचकांनी नीट लक्षपूर्वक पाहिले असेल तर तुमच्या लक्षात येईल की माझ्या प्रोफाइल मध्ये माझी टॅग लाइनच ही आहे...'मनापासून हृदयापर्यंत'...यामुळे हे अॅप माझ्यासाठी फक्त अॅप नसून माझ्या हृदयाच्या अगदी जवळ असलेलं माझं दुसरं हृदयचं आहे जणू...
जशी एखाद्या प्रोजेक्ट ची किंवा फाईल ची 'ब्लू' प्रिंट असते अगदी तशी माझ्या हृदयाची ब्लूप्रिंट...म्हणजेच हे 'ब्लू'पॅड... अॅप.
ज्या अॅप ने माझी नाळ माझ्या वाचकांशी जोडली.जे रोज नवनव्या वाचकांना माझ्या हृदयात स्थान देत आहे.... आणि माझ्या शब्दांना हजारो वाचकांच्या डोळ्यांच्या प्रवेशद्वाराने हृदयातं विराजमान करत आहे...माझी जणू त्यांच्याशी एक प्रकारची काव्य मैत्रीचं या ब्लूपॅड अॅप ने केली आहे....
माझीच यापूर्वी मी लिहिलेली अगदी छोटीशी कविता आहे काव्य मैत्री ती अशी...
काव्य मैत्री
कविता आवडली तर दाद द्या
नाहीतर फक्त हातात हात द्या
तुमची साथ मिळताच शब्दं ही
मग आपोआप बरसू लागतील
मनात हळू हळू झीरपू लागतील
उमलेल मग खोल मनातून
कवितेच एक नवं फुलं अजून
ज्याला असेल तुमच्या न माझ्या
मैत्रीचा अनोखा असा वेगळा गंध
मोहरेल जो साऱ्या जगाला
काव्य मैत्रीचा हा नवा कोरा सुगंध.
ही झाली माझी लेखक म्हणून प्रतिक्रया...पण लेखक हा सर्वात प्रथम उत्तम वाचक असतो...आणि या अॅप ने मला वाचनासाठी सर्वात मोठे दालन खुले केले आहे...ज्या दालनात मी मोकळ्या वेळेत एक फेरफटका मारून माझी शब्दांची भूक शमवू शकतो.
मी आपल्या या "ब्लूपॅड अॅप" च्या संपूर्ण टीम चे मन:पूर्वक आभार मानतो.तसेच त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस आणि अॅप मध्ये नवनवीन सुधारणा करण्यास शुभेच्छा आणि प्रोत्साहन देतो.
भावनेला नाहीत मर्यादा पण
शब्दांना आहेत त्या जराश्या
किती नि कसे होवू मी व्यक्तं
होतील त्या दोन मिनिटातं पूर्ण कश्या.
डॉ अमित.

42 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad