जीवनाच्या वाटेवरती,. काटे कुठे फुले रे असतील.... मुक्या कळ्या फुलविताना,. जगातील तुला रे हसतील...
दगडाला आकार देताना तुझ्याच हातावर बसेल वार. जखमा तुझ्या त्या झिरपुन जातील जेव्हा् शिल्पकलेचा होईल बहार
पाण्या परी तुला वाहताना. दगड गोटे आडवे येतील अपयशाची पायरी चढताना वेदना तुला रे होतील
रोपट्ट्यातून गुलाब काढताना. क्रूर काटे तुला टोचतील. गुलाबापरी यश तुझे ते. अलगद तुला ते कसे देईल
मार्गक्रमण तुला करताना. अनेक तू ठेचा खाशील. पर्वतापरि निश्चय बघुनी. देणारे ठेचा थकून जातील.
स्वतःचा स्वार्थ जगती सारे. सत्य सुख आतून लुप्त होती. त स्त्रोत होय तयार जवळी सुखाचा. जी दुसऱ्या स्तव दुःख वेचती...