Bluepadदूर जात आहेस तर...!
Bluepad

दूर जात आहेस तर...!

Vijay Kadam
Vijay Kadam
4th Oct, 2020

Share

तू माझ्यापासून दूर जातच आहेस तर माझ्या काही आठवणी ज्या तुझ्यापाशी आहेत त्या मला परत कर....
चिंब पावसात भिजलेले असताना मी आवेगाने घेतलेल्या मिठीची उब तुझ्या उशाशी रेंगाळत आहे ती उब मला परत कर...
गर्द राईतून जाताना आपण वाट चुकलो होतो. ती पाउलवाट तुझ्या गालाच्या तिळापाशी येऊन थांबते ती पाउलवाट मला परत कर....
तुझ्या अबोल स्पर्शाने तुझ्या ओंजळीतील मोगऱ्याची फुले आसुसलेली होती. ती मोगरीची फुले तुझ्या घराच्या खिडकीपाशी दरवळत आहेत. ती मोगऱ्याची फुले मला परत कर...
तू मारलेल्या खड्याने पाण्यावर जे तरंग उठले, त्या तरंगाची वलयांकित नक्षी अन तरंगात पडलेल्या तुझ्या सुंदर प्रतिबिंबाची छबी मला परत कर...
समुद्राच्या वाळूत आपण सोबत दूर गेलेलो त्या पाऊलखुणा क्षितिजापर्यंत जातात त्या पाऊलखुणा मला परत कर...
तुझ्या भुरभुरणार-या केसात अल्लड वारा वाट चुकला होता. तो वारा तुझ्या गालापाशी अजूनही घुटमळत आहे तो वारा मला परत कर...
तुझ्या गालावरची खळी पडायची कित्येकांच्या हृदयाचा ठोका चुकवायची ती गालावरची खळी मला परत कर...
मी उशीरा आल्यावर तू जो लटका राग आणायची, तो राग तुझ्या ओठांपाशी अडखळला तो लटका राग मला परत कर...
उन्हातुन चालताना तुझी सावली माझ्या सावलीत विरघळून जायची ती सावली मला उन्हातही सावली द्यायची ती सावली मला परत कर....
विजय कदम....
9699913150

4 

Share


Vijay Kadam
Written by
Vijay Kadam

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad