Bluepadचांदण्यांत आई...
Bluepad

चांदण्यांत आई...

O
Omkar Chandane
4th Oct, 2020

Share

आई तो लहान असल्यापासून
दर रात्री चांदण्यांनी,
भरलेल्या आकाशात
त्याच्या सोबत
एकटक पाहत बसायची
तो नेहमी विचारायचा,
आई रोज रात्री आपण
ताऱ्यांना का बरे पाहतो?
मला खूप आवडत रे,
मी जेव्हा तिथे असेन तेव्हा रोज
मला तू असं पाहायचं,
आणि हसत राहायचं,
थोड्या दिवसांत
कॅन्सरने आई गेली,
आज नेहमीप्रमाणे
रात्री आकाशात पाहताना
अचानक त्याला तुटता तारा दिसला,
ए आई ये चल विश मागितलीये,
पुन्हा सोबत पाहूयात तारे
आवडतात ना तुला......
Insta:-@marathi_lekhak

4 

Share


O
Written by
Omkar Chandane

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad