Bluepadस्वयंशिस्त !
Bluepad

स्वयंशिस्त !

M
Milind Gaddamwar
16th May, 2020

Share

स्वयंशिस्त ही स्वाभाविक भावना आहे.स्वयंशिस्त मुंगी कडून शिकावी.मुंगी कधीही आपली रांग सोडत नाही.शिस्तीचे पालन करून वर्षभराचा अन्नसाठा मुंगी करीत असते.
स्वयंशिस्त ही आपोआप येत नसते.ती महत्प्रयासाने जोपासावी लागते.लहान मुलें ही दुसऱ्यांचे अनुसरण करीत असतात.याच वयात त्यांना स्वयंशिस्तीचे धडे गिरवीता येतात.कुंभार जसा मऊ मातीला पाहिजे तसा आकार देऊ शकतो तसेच लहान मुलांचे असते.कोवळ्या वयात कुणाशी कसे वर्तन ठेवले पाहिजे हे शिकविले गेले पाहिजे.स्वयंशिस्त ही ओढूनताणून अंगी बांधता येत नाही.स्वयंशिस्त स्वत: अंगीकारावी लागते.ती प्रत्यक्षात अंमलात आणावी लागते.याचा चांगला परिणाम समाजातील घटकांवर होत असतो.सार्वजनिक ठिकाणी थुंकू नये,शौच-लघुशंका करू नये,कचरा टाकू नये ही सांगण्याची वेळ आपल्यावर कां यावी ? स्वच्छता हा जीवनाचा अविभाज्य घटक आहे.मग स्वच्छता पाळा असे सांगणे गैर ठरते.स्वयंशिस्त ही स्वत:हून पाळायची असते.आरोग्याची निगा राखणे, समाजात वावरतांना आपल्यामुळे दुस-या कुणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणे, हे स्वयंशिस्तीत मोडते.सरकारी नियमांचे पालन करणे हे स्वयंशिस्तीत मोडते.मग कोरोनाच्या विषाणू पासून दूर राहण्यासाठी हे सर्व करने हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्यच ठरते.
* मिलिंद गड्डमवार,राजुरा
भ्र.क्र.९५११२१५२००

8 

Share


M
Written by
Milind Gaddamwar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad