Bluepadमाणुसकी
Bluepad

माणुसकी

माझी लेखणी ✍️
माझी लेखणी ✍️
3rd Oct, 2020

Share

माझं माझं म्हणता म्हणता
आयुष्य निघून जात
अन समोर उरतो
तो फक्त निष्प्राण देह
हे माझं होतं
अन ते माझं होतं
जाताना मात्र सगळं
इथेच ठेऊन जावं लागतं
तेव्हा माणसा आता तरी सुधार
आजूबाजूच्या सगळ्याला
आपलं म्हणायला लाग
जाताना काहीच घेऊन जायचं नसतं रे
येताना जसे एकटे आलो ना
तसं एकटच जायचं असत रे
स्वतःमध्ये असलेली माणुसकी
आतातरी दाखव....
निदान पुढच्या पिढीला तरी
सगळं आपलं म्हणायला शिकावं
स्वार्थीपणा कमी कर
निस्वार्थीपणे वाग
आता तरी निदान सगळ्यांशी प्रेमाने वाग
आज आहेस तर उद्या नाहिस
कुणी कसं बरं सांगावं?
विधात्याच्या मनात काय आहे?
हे आपण कसं ओळखावं??

22 

Share


माझी लेखणी ✍️
Written by
माझी लेखणी ✍️

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad