हे जीवना... मी तुला काय भेट देऊ.
दिलेस तू मला इतके की आता
ओंजळीत नाही शिल्लक जागा काही
हातावरच्या रेषांनाही पडले कोडे ज्याचे
हे जीवना,मी तुला काय भेट देऊ..
हा श्वासं दिला नि जगण्याचा ध्यासं
स्वप्नें दिलीस डोळ्यांना इंद्रधनुसम
या स्वप्नातं मश्गूल़ होण्याआधी सांग ना
हे जीवना,मी तुला काय भेट देऊ..
साथ दिली सुखदुःखातं आपल्यांची
दिला मायेचा पदरही तू या डोईवर
पावलांना ही योग्य वाट दाविली तू
हे जीवना,मी तुला काय भेट देऊ...
बुद्धी सोबत दिलास तू सद्सद्विवेकं
मनालाही ठेवण्या आपल्या काबूत
ह्रुदयात दिलेस प्रेमं मनातं ममता दिलीस
हे जीवना,मी तुला काय भेट देऊ...
रिटर्न गिफ्ट च्या आजच्या जमान्यात
माझी भेट असेल अगदीच तुच्छ़ जरी
घे गोड मानून तू सुखावेन मग मी अंतरी
हे जीवना,मी तुला काय भेट देऊ...
माहीत आहे मजला तुला अपेक्षा नाही
माझ्या कडे तुला देण्या यापेक्षा जास्त नाही
देतो माणुसकीचे वचन निभावेन जे कायम
हे जीवना,तुला यापेक्षा दुसरे काय देऊ...
डॉ अमित.