Bluepadआयुष्या
Bluepad

आयुष्या

Rajani Nikalje
Rajani Nikalje
30th Sep, 2020

Share

एक ही छळते मला सल फार आयुष्या
जवळचे पाठीत करती वार आयुष्या..
मी निघाले चंद्र तो घेवून साथीला
उंबऱ्यावर पाहिला अंधार आयुष्या...
जीवनाला भार झाले मीच माझ्या रे
ना कुणाचा लाभला आधार आयुष्या...
पेटत्या चूलीत दिसते आग देहाची
सोसतांना जाहले बेजार आयुष्या....
भाकरीची भूक सुंदर रात स्वप्नांची
पाहिले मी स्वप्न काळेशार आयुष्या...
हीच आहे वेळ आता मागण्याची रे
हात हाती दे जरा अलवार आयुष्या...
वेंधळे आहेत थोडे शब्द रजनीचे
शब्द सुमने वाहते स्वीकार आयुष्या...
रजनी निकाळजे
मीरा रोड मुंबई..

16 

Share


Rajani Nikalje
Written by
Rajani Nikalje

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad