Bluepadआघात...सोसण्यापलिकडचे🙃
Bluepad

आघात...सोसण्यापलिकडचे🙃

ऋतुजा चव्हाण..
30th Sep, 2020

Share

एकदा लहानपणी एका मुलीने सहज पेपर वाचत असलेल्या आईला प्रश्न केला आई बलात्कार म्हणजे काय? साधारणतः चौथीच्या वर्गात असेल ती मुलगी तेव्हा आई मात्र निःशब्द झाली . तिला काय सांगावे नाही कळले आणि तिने विषय बदलला. लहान असलेल्या मुलीचे समाधान झाले नाही आणि ती थोडीशी संतापली मनोमन पण सोडून दिले तिने नंतर. तुम्हाला काय वाटते बरोबर केलं आईने ?... मला तर नाही वाट्ले हे बरोबर. त्यानंतर मुलगी मोठी होऊ लागली. आसपासच्या नात्याशी सबंध येऊ लागला . ती मोठी तर होत होती पण सोबत अनेक प्रश्न घेऊन . त्यांचे उत्तरं मात्र तिच्याकडे नव्हती. हळू हळू होत असलेला तारुण्यातील प्रवेश आणि त्यासोबत होणाऱ्या बदलाची माहिती तिला मिळायला पाहिजे होती ती पण कोणा बाहेरच्या पेक्षा घरातल्यापासून. आयुष्यातील समस्या सर्वांना सारख्या तर नसता ना ! अनेकांना खूप काही भोगावं लागत त्यातून खंबीरपणे बाहेर पडावं लागत तर काहींना यातल्या कशाचीच जाणीव नसते हीच सर्वात मोठी शोकांतिका. आता पुन्हा गोष्टीकडे येऊ खरंच किती गरजेचं होत तिला कळणे .दुर्दैव म्हणजे नाही कळलं. आता पुढची गोष्ट म्हणजे नंतर त्यांच्याघरी त्यांचा एक नातेवाईक राहत असतो मामाच समजा ना तिचा. नेहमीप्रमाणे विश्वासावर उभी असलेल्या नात्याचा डोलारा पण कसा कोसळला जावा तो पण मुलीच्या आयुष्यावर . आता तुम्ही समजलाच असाल गोष्ट. साधी गोष्ट हो पण खूप काही सांगून जाते आपल्याला . खूप काही शिकवून जाते विशेषतः आई मुलीच्या नात्याला . सांगणे फक्त इतकेच की मुलीला केवळ ४ पुस्तके वाचायची शिकवू नका . तिला माणसे ओळखायला शिकवा . नात्यातील सबंध ओळखायला शिकवा. आपण काही जग बदलू शकत नाही ना अपराध करणाऱ्याला शिक्षा देऊ शकतो. पण आपण काळजी घेऊ शकतो ना आईप्रमाणे आपल्या मुलीपासून ते आपल्या आसपासच्या सर्व मुलींची. हे कर्तव्य आजच्या घडीला सर्व श्रेष्ठ मानले जाईल कारण नाही हो पाहू शकत आपल्या मुलीवरील आत्याचार .नंतर मेणबत्ती लावण्यापेक्षा आधीच आपल्या डोळ्या समोरील अंधार दूर करू. आपल्या घरातील पणतीला सतत तेवत ठेवली तर खरा अंधकार दूर होईल. गोष्ट काल्पनिक आहे पण खूप काही शिकवून जाते.

14 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad