Bluepad | Bluepad
Bluepad
फुलशेती
दीपक केदू अहिरे
दीपक केदू अहिरे
29th Sep, 2020

Share

फुलशेती
फुलशेती नको उघड्यावर, करा हरितगृहात
याने उत्पन्न वाढते नी पीक येते जोमात।।
फुलशेतीत करा फुलांचा राजा गुलाब
याेग्य मशागत करून ठेवा त्याची आब।।
लांब दांड्याचे फूल, आकर्षक जरबेरा
त्याच्यासाठी करा गादीवाफ्याचा सारा।।
कानेॅशन लावा आता स्टॅंडर्ड व स्प्रे प्रकारात
मागणी आहे दुरंगीला कटफ्लाॅवर आकारात।।
दसरा, दिवाळी, लग्नसराईत मागणी झेंडूला
वेळेवर लागवडीचे गणित चुकवू नका याला।।
करा कंदवर्गीय ग्लॅडिआेलस फुलझाड
फुले केशरी, ऐंशी दिवसात हाेते पूर्ण वाढ।।
वर्षाच्या तिन्ही हंगामात फुलताे अॅस्टर
याच्या ताेडणीसाठी वापरा धारदार कटर।।
लावा मागणीनुसार माेगरावगीॅय फुलझाडे
चुकवू नका याला सेंद्रिय खत, पाण्याचे खाडे।।
आॅकिॅड वाढवा घरात, बाहेर उघड्यावर
फुलांचा भाव असताे आकारावर नी रंगावर।।
पिवळ्या रंगाच्या साेनतुर्याला असते वाढ
झुपक्याचा असताे दांडा म्हणून गाेल्डन राॅड।।
आमराई, नारळाच्या सावलीत लावा अबाेली
गव्हासारख्या लाेंबी छेदातून याची फुले आली।।
फुलांच्या क्रमवारीत दुसरा शेवंतीचा नंबर
आल्हाददायक मंद सुवास, रंगसंगतीचा थर।।
लावा तुम्ही बडॆ आॅफ पॅरेडाईज कटफ्लाॅवर
याच्या दिसण्याने हाेताे स्वगॆपक्षांचा वावर।।
लिली प्रजाती बागेच्या साैंदयाॆत घालतात भर
या कंदाचा चीनमध्ये खाद्य म्हणून हाेताे वापर।।
निशिगंधाला म्हणतात गुलछडी, रजनीगंधा
नियमीतपणे देताे उत्पन्न हा फुलशेतीचा धंदा।।
अळूच्या पानासारखे असते अॅन्थुरीयम
पाळा याला देशविदेशात नियाॆतीचे नियम।।
उष्ण व दमट हवामानात येते गॅलाडिॅया
याच्या लागवडीने जमवाल तुम्ही माया।।
प्रत्येकाला हवेहवेसे आकषॆक फुल डेलिया
सांभाळा जरा याला नाजूक असते काया।।
शिकून घ्या आता बाेनसाय, वामनवृक्षकला
याने मिळेल वाव तुमच्या अंगभूत कलेला।।
दीपू म्हणे करा परसबागेत, शेतात फुलशेती
याने अनुभवाल मनाची नी पैशांची श्रीमंती।।
© दीपक केदू अहिरे
नाशिक
फुलशेती
फुलशेती

18 

Share


दीपक केदू अहिरे
Written by
दीपक केदू अहिरे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad