Bluepad२० मिनिटांचा रुल घेऊन जाईल यश शिखराकडे !
Bluepad

२० मिनिटांचा रुल घेऊन जाईल यश शिखराकडे !

R
Rohan Pandit
29th Sep, 2020

Share


माणसाच्या सवयी त्याचे संस्कार कसे आहेत ते दाखवतात. त्याच सोबत माणसाचे संस्कार त्याच्या सवयी सुद्धा घडवतात. ह्या सवयी माणसाला आयुष्यात यशस्वी किंवा अयशस्वी ठरवतात. स्टिव जॉब्ज म्हणाले होते, “कोणा दुसर्‍याच्या यशासाठी तुम्ही झटू नका. दुसर्‍या कोणाचं आयुष्य तुम्ही जगू नका.” खरं आहे. तुम्हाला तुमचं आयुष्य आहे आणि तुम्ही त्याला अधिक पैलू पडू शकता. यासाठी आपण काही यशस्वी लोकांच्या सवयी पहिल्या तर त्यातून आयुष्य जगण्याची काही महत्त्वाची सूत्र आपल्याला दिसतात.


एक म्हणजे तुमच्यासाठी एक आदर्श आयुष्य काय आहे त्याचा आपल्यातच शोध घ्या. म्हणजे तुम्हाला तुमच्या कुटुंबाला नेहमी आनंदी ठेवायचं आहे आणि त्यासोबत तुम्हाला तुमची स्वप्नं पूर्ण करायची आहेत. दुसरं या प्रत्येक स्वप्न पूर्तीसाठी एक लक्ष्य निश्चित करा. आणि तिसरं ते लक्ष्य साध्य करण्यासाठी आपल्या सवयी निश्चित करा.

लक्ष्य साधण्याच्या सवयींना “गोल हॅबिट्स” म्हणतात. ह्या सवयी तुमच्या रोजच्या आयुष्यात सकारात्मक बदल करतातच पण एक दिवस त्या सवयी तुम्हाला तुमच्या लक्ष्यापर्यंत घेऊन जातात आणि यश तुमच्या शिरपेचात येऊन बसतं.

आपण जेंव्हा एखाद्या व्यक्तिचं यश पाहतो तेंव्हा ते एका रात्रीत मिळालेलं नसतं. अनेक वर्षांची मेहनत आणि त्याच्या सवयींमध्ये असलेलं सातत्य त्याला कारण असतं. तुम्हाला सुद्धा असं यश हवं असेल तर अशा काही सवयी आपल्या अंगी बाणवून घ्या. ते करणं फार कठीण नाहीये. थोडासा वेळ, धैर्य, सकारात्मकता आणि सातत्य बस एवढंच तुमच्याकडे असायला पाहिजे. ह्या सगळ्या सवयी तुमच्यामध्ये मुरवणं तुम्हाला कठीण वाटत असेल तर यासाठी एक अगदी सोपा मार्ग आहे. तो आहे “वीस मिनिटे नियम”. ही अगदी तीन टप्प्यांमध्ये करण्याची सोपी पद्धत आहे.

पहिला टप्पा आहे, एखादी अशी सवय निवडा जी तुमची “गोल हॅबिट” असेल. उदाहरणार्थ उत्तम लेखक होण्यासाठी वाचन करणं आवश्यक आहे. पण तुम्हाला तेवढा वेळ मिळत नाही. मग “वाचन” ही तुमची गोल हॅबिट आहे. दूसरा टप्पा, कसं ही करून दिवसभरतून वीस मिनिटं वाचनासाठी काढा. तिसरा टप्पा, अशा प्रकारची गोल हॅबिट सतत तीस दिवस करा. यात खंड पडू देऊ नका.

यात तुम्ही २० मिनिटे वाचन, गायन, गाणी ऐकणे, खेळणे, ध्यान धारणा, कोडिंग शिकणे आणि करणे, अन्य यशस्वी लोकांशी संवाद साधणे, आयुष्याचे लक्ष्य ठरवण्यासाठी आपल्या ओळखीतील लोकांशी संवाद साधणे, एखादा लहान व्यवसाय सुरू करणे जो कदाचित उद्या मोठं रूप घेऊ शकतो, इत्यादि गोष्टी करू शकता.

तीस दिवसात तुमच्या मेंदूमध्ये काही विशिष्ट पेशीय बदल होऊन तुमच्या सवयीची मेंदूला सवय होते आणि अलीकडच्या शरीरशास्त्राच्या अभ्यासानुसार, ६६ व्या किंवा २५६ व्या दिवशी पापण्या मिटण्याच्या प्रक्रिये प्माणे तुमची ती सवय एक सहज क्रिया होऊन जाते.

ह्या सहज बनलेल्या सवयी मेंदूवर येणारा कामाचा किंवा सतत बदलणार्‍या शारिर क्रियांमुळे येणारा अतिरिक्त भार कमी करतात आणि मेंदू अधिक जोमाने काम करू लागतो. एकदा का ही सवय तुमच्या अंगवळणी पडली की तुम्ही दुसरी सवय त्याच तीन टप्प्यांनी सुरू करू शकता. एक एक करत तुम्ही अनेक चांगल्या सवयी अंगवळणी पडून घेऊ शकता.

अशा प्रकारे दिवसातील फक्त २० मिनिटे देऊन तुम्ही तुमच्या मेंदूच्या पेशींमध्ये सतत तीस दिवस संवाद घडवून आणता आणि तुम्ही तुमच्या लक्ष्याच्या दिशेने वाटचाल करू शकता.

36 

Share


R
Written by
Rohan Pandit

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad