Bluepad | Bluepad
Bluepad
ऋतू फुलांचे (गझल)
Rajani Nikalje
Rajani Nikalje
29th Sep, 2020

Share

वाटेवरती मन अंथरले
तू आल्यावर मी मोहरले..
क्षण प्रेमाचे तुझे न माझे
ऋतू फुलांचे छान बहरले..
आयुष्याचे जीवन गाणे
आनंदाने मी गुणगुणले...
तुझ्या मिठीचा धुंद गारवा
स्पर्श होताच मी थर-थरले..
तुझ्या प्रितीचा सुगंध आला
रोम रोम माझे मोहरले.....
रजनी निकाळजे

16 

Share


Rajani Nikalje
Written by
Rajani Nikalje

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad