Bluepadहरवत होते
Bluepad

हरवत होते

Rajani Nikalje
Rajani Nikalje
28th Sep, 2020

Share

तुला कधीचे शोधत होते
मन माझेही हरवत होते..
आयुष्यावर तुझ्या न माझ्या
गझल नव्याने खरडत होते...
आशय नव्हता जीवनात पण
काफियात मी मांडत होते...
हासत हासत तुला बोलते
दुःख मनाचे लपवत होते...
उडून गेले सुख आकाशी
दुरून त्याला पाहत होते...
रजनी निकाळजे
(शब्द रजनी)

22 

Share


Rajani Nikalje
Written by
Rajani Nikalje

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad