Bluepadचाळीशी.....बघा लाजते मनातल्या मनात कशी.
Bluepad

चाळीशी.....बघा लाजते मनातल्या मनात कशी.

डॉ अमित.
डॉ अमित.
28th Sep, 2020

Share


चाळीशी.....बघा लाजते मनातल्या मनात कशी.


का बे..चाळीशी गाठली की बे तू?

तर ही आमच्या सोलापूर जिल्ह्याची बोली...बरोबर ना?
आपलंसं वाटलं ना वाचून?मलाही.
हो खरंच की बघता बघता चाळीशी गाठून तीन वर्ष पूर्ण झालीत.... माझी आणि आमच्या समवयस्क मित्रांची...(असं लिहिण्याचे कारण की मी एकटाचं चाळीशी चा झालो असं म्हटलं तर थोडसं टेन्शन येतं पण सगळेचं मित्र सोबत चाळीशीच्या पुढे गेले म्हटलं की उगीच हायस वाटतं..ही आपली मानसिकता बरका 😂😂) खरं तर चाळीशी म्हणजे म्हातारा होण्या आधीचे तरुणपणं...चाळीशी म्हणजे आयुष्याच्या चित्रपटाचे मध्यंतर..
खरंच वाटत नाही ना की कसं हे वयाचं चक्र गतिमान होते आहे.वय वाढतं आहे आणि आयुष्य कमी होत आहे.पण आयुष्य कमी होत आहे हे थोडंसं जड जातंय ना ऐकायला,सांगायलाही.पण सत्य आहे ते आहे.मग हे कमी होत चाललेले आयुष्य सुंदर करण्याचा ते अधिक उत्कटतेने जगण्याचा संकल्प नको का करायला?
मी सद्गुरू यांचा सुंदर असा एक विचार ऐकला होता.ते म्हणतात की आपण असं जगायला हवं की आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला आवडू लागलो पाहिजे.मग ती व्यक्ती असो की झाडी,प्राणी, फुल किंवा तत्सम निसर्गातील आणखी बऱ्याच गोष्टी.हो ते असे म्हणतात की या सर्वांची ही एक वेगळी पद्धत असते ती आपण त्यांना आवडलो की नाही हे व्यक्त करण्याची.
या सर्वाने होते काय की हे वातावरण चांगल्या गोष्टींनी व्यापून जातं.आपणही वातावरणात काही अंशी पॉझिटिव्ह ऊर्जा संप्रेरित करत राहतो.
वय तर वाढतचं राहणार पण ही वाढ जर आतून होत राहिली,म्हणजे आपणही थोड आतून बहरत राहिलो,सकारात्मक बदलत राहिलो तर मग का नाही आवडणार आपण आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला?
आपणास जर कोणी म्हटले की तू किंवा तुम्ही मला खूप आवडता तर आपलं मनं किती प्रफुल्लितं होतं.आपल्याला पण त्या व्यक्तिच्या चांगल्या गोष्टी मग नकळत आकर्षित करू लागतात.हे मग असे होते की सर्व चांगल्या गोष्टी एकमेकांकडे आकर्षित होतात नि चांगुलपणावरचा आपला विश्वास अजुन वाढू लागतो.
तर ठरवूया आजपासून नव्हे आतापासून की आपण अशी एक तरी गोष्ट नक्कीच करूयात आपल्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीसाठी की आपण त्याला आवडू.बऱ्याचदा आपण एखाद्या व्यक्तीची यापूर्वीची कटू आठवण मनात ठेवून तो परत भेटल्यावर तो पूर्वग्रहं मनात ठेवूनच त्याच्याशी वागतो बोलतो.पण त्याने होते काय की नकारात्मकता अजुन वाढत जाते.तेंव्हा आपण असा पूर्वग्रह मनात न ठेवता पुन्हा नव्याने त्याच्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न केल्यास आपल्यातील नातं हळू हळू सुधारण्याला नक्कीचं सुरुवात होईल.ही गोष्ट अगदी सहजपणे व्हायला हवी.कदाचित नकळत पण तसा प्रयत्न तर आपण नक्की करायला हवा.
मी तो हा लेख लिहून आताच केला आहे.तुम्हालाही तो आवडेल आणि त्या अनुसंघाने मीही आवडू लागेल?
कसं आहे ना की बऱ्याच वेळेस आपण बोलून दाखवायला किंवा भावना व्यक्त करायला आपलं मन संकुचित करतो..पण काय हरकत आहे दोन कौतुकाचे शब्द मनापासून बोलायला...मग पहा समोरची व्यक्ती ही मग कशी मनमोकळी होते...
जर मग तुम्हाला माझे लेख आवडतं असतील तर तुम्हीही फक्त लाईक न देता दोन कौतुकाचे शब्द कमेंट मध्ये टाका...काही न आवडल्यास ते देखील सांगा....मग पहा संवादाचा हा पूल आपले रोजचे वाढणारे आयुष्य किती सुंदर आणि बहरलेलं करतो ते.


तुम्हीही कराल ना मग याची सुरुवात?

शुभश्य शीघ्रम.....


मग पहा तुम्हीही चाळीशी गाठली असेल तर तुमची ही चाळीशीही तुमच्या कडे पाहून 'नववधू ' सारखी लाजेल आणि तुमच्या आयुष्यात नवे चैतन्य जागवेल...😊🙏डॉ अमित.

25 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad