Bluepad | Bluepad
Bluepad
कमांडर
राकेश इंगवले
राकेश इंगवले
28th Sep, 2020

Share

कमांडर
उंबरठाच्या आत रहा अस आपण प्रत्येक बाबतीत मुलाना सांगत असतोच !
एव्हाना मुलं मोठी होतात  तसा उंबरठा ओलांडून बाहेर जातात , माझ्या घराची परिस्तिथी तशी चांगलीच आहे घरात माझी बहिण अनघा आणि मी आणि माझी आई असं कुटुंब आम्ही गुण्यागोविंदाने राहतो ! माझे बाबा सैन्यात असल्यामुळे एका बॉर्डर वरील चकमकीत ते  शाहिद झाले , त्यांच्या कृपेने तरी आम्हाला दुसऱ्यांचे उंबरठे घासायला लागले नाहीत त्यांच्या पेन्शन वर घरातलं खर्च चालू असे तेव्हा माझी बहिण आणि मी लहान असल्या कारणाने सगळं चाललं पण अत्ता आम्ही मोठे होऊ लागलो तश्या गरजा वाढू लागल्या ! अत्ता बाबांच्या पेन्शनीवर घर चालू न लागल्याने आई परप्रांतीय लोकांच्या घरी धुन भांडी करू लागली आणि आमचा सगळा खर्च बगू लागली  तशी ती लोक सुद्धा चांगली भेटली दररोजिच्या जेवणानंतर आई भांडी घासून घरी निघायची वेळी त्यांच्या हाथुन निरनिराळ्या जेवणातील विशिष्ट पदार्थ घेऊन यायची !  ते खूप खायला आवडायचं ही, पण अत्ता मी मोठा झालो अत्ता त्या आईच्या विशिष्ठ पदार्थांची जागा सँडविच , बर्गर इत्यादी., यांनी घेतली आणि आईचे आणलेले जेवण मला आमच्या गरिबीकडून बगून दिलं असावं असच वाटायचं ! त्याअर्थाने मी कित्येकदा नाकारून न जेवता झोपी गेलो , शाळेतील शिक्षण संपून कॉलेज मध्ये आलो तेव्हा इकडची डॅशिंग कपडे , डॅशिंग गाड्या , मोबाईल इत्यादी.,पण आम्ही शाळेत असताना एक जोड कपडे ढुंगणाला ठिगळं पडूपर्यंत घालायचो इकडच वातावरण बगून माझा गरिबी पणा सोडून मला खोटा श्रीमंती पणा हवा हवासा वाटू लागला , आई कडे मी माझ्या जन्मदिवसानिम्मित गिफ्ट म्हणून गाडी मागितली पण तिने सरस नकार दिला ! ती म्हणाली "अंथरून पाहून पाय पसरावे" अस बोलत तिने माझ्या गाडीला टाळल , मी रागात घरातून निघून चालत चालत कधी एक किलोमीटर अंतर कापून एका वस्ती मध्ये कधी पोचलो कळलंच नाही,तिकडे थकून एका बाकड्यावर बसलो तेवड्यात माझा एक कॉलेज मधील अलीकडच्या तोंड ओळखीने झालेला नवीन मित्र अस्लम भेटला.
           जेवणानंतर काही व्यायाम साठी घराबाहेर निघतो ते फक्त फोन वर मुलींशी बोलण्यासाठी असं तरी असतचं असतं फक्त कारण म्हणून तो व्यायाम च सोंग करत फिरत होता कानात हेडफोन घालून मला बगून तो दचकला माझ्या जवळ येऊन म्हणाला अरे तू स्वप्नील ना " मी म्हणालो हो"
मी परत त्याला प्रश्न केला ?
पण  तू....  तोच......च  ना आमच्या वर्गातील अति श्रीमंत मुलगा 
अरे हो तो मीच !
मग तू इकडे काय करतोस आहेस ?
(कानातील हेडफोन सरसावत तो कॉल वरील व्यक्तीला म्हणाला मी तुझ्याशी थोडं नंतर बोलतो.)
माझ्याकडे बगून म्हणाला हा बोल काय म्हणत होतास तू ?
अरे .. मी म्हणत होतो तू इकडे काय करतोयस ? इथे तुझं काही काम होतं म्हणून आला होतास का ?
तो तातकळत म्हणाला अरे... अरे .... अरे.... स्वप्नील ..
अरे अरे अरे काय करतोयस बोल काही ?
अरे .. स्वप्नील मी इकडे राहतो !
अस म्हणता हा प्रसंग माझ्या डोक्यावरून गेला ,आणि मी बाकड्यावर बसलेलो पटकन उठलो आणि लगेच त्याला म्हणालो अरे .. तुझा इथे बंगला आहे का?
तो क्षणिक म्हणाला गरिबांचा कसला आलाय बंगाल ( तो समोरच्या दिशेने हाथ करत ) ती बगतोयस झोपडी आणि झोपडीच्या बाहेर ज्या बाईला जो पुरुष दारुण पिऊन मारतोय तो माझा बा आणि मारखाणारी माझी आई! ते बग ते बग ते !!
माझा डोक्यातील राग थांबला आणि मी विचार करू लागलो की वर्गातील एवढा श्रीमंत मुलगा जो दरोज गाडी घेऊन येतो काय, मोबाईल काय सारखे बदलतो, त्याचं घर हे कसं असेल या प्रश्नात मी मग्न ?
तो मला स्वप्नील स्वप्नील म्हणून हाक मारू लागला आणि मग मी माझ्या त्या स्वप्नातून उठलो आणि त्याला म्हणालो हे एवढ सगळं सांगण्याचं मला कारण काय , तुला हे लपवून सुद्धा ठेवता आलं असत उद्या मी बोलता बोलता बोलून गेलो तर तुझी कॉलेज मध्ये नाच्याकी होईल ! हे माहीत असताना ??
हो माहीत आहे मला .
मग तरीपण अस ?
अरे तुला मी सर्व भेटून सांगणारच होतो , देवाची कृपा तू मला इकडे भेटलास !
पण मला का सांगणार होतास  ?
सांगतो सांगतो ऐक ....  परवा तू तुझ्या मित्राकडून गाडी घेण्यासाठी उसने पैसे मागत होतास ! त्याची न्युज माझ्या पर्यंत पोचली बरं !
पण हे तुला कसं माहीत ?
तुझ्या घराजवळ माझा मित्र राहतो त्यांच्याकडून सगळं कळत तुला आई गाडी साठी नकार देणारे हे तुझ्या गरिबीकडे बगून तुला आधीच कळलं होत म्हंटल्यावर तू आधीच मित्राकडून उसन्या पैशाची जोडणा लावत होतास तेव्हाच मला कळलं तू माझ्या गॅंग मध्ये काम करायला असला पाहिजेस !  म्हणजे तुझा गरिबीचा प्रश्न सुटेल .
कसली गॅंग ? मला काहीएक समजत नाहीये .... ?
स्वप्नील हे बग तुझ्या शाळेत असताना तुला कधी गाडी चालवण्याचा मोह किंव्हा घ्याचा मोह आला ?
नाही.
मग कॉलेज च वातावरण बगून इथल्या मौजमस्ती बगून तुला मोह चढला तर....  गाडीची अपेक्षा दहावीच्या पेपराला आई कडून करू शकला असतास ! पण तू नाही केलंस , असंच असतं मित्रा ( माझ्या पाठीवर हाथ ठेवत ) एकदा का शाळेतुन गाडी कॉलेजकडे ओळली अपेक्षा आपल्या खूप वाढतात इथल्या गोष्टी मोहक वाटू लागतात, घरातील असणाऱ्या माठ ची जागा आता फ्रिज नि घेतलेली आहे तू बगतोसच आहेस !
तेवढ्यात मी म्हणालो ,
पण तू असल्या झोपडपट्टी मध्ये राहून तुझ्या अपेक्षा तू कश्या पूर्ण करतोस ? बाप बेवडा आणि आई चार घरच धुन भांडी करून तुला हे एवढ्या सगळ्या तुझ्या इच्छा पूर्ण करेल अस काही वाटतं नाही ....
त्यासाठीच असतो मित्रा काहीतरी फंडा ! तू मला कॉलेज मध्ये डॅशिंग कपडे घालून डॅशिंग मोबाईल वापरताना बघितलं असशील पण खरी दुनिया आमची रात्री चालू होते आणि रात्रभर काम करून आई-बाबांच्या डोक्यावर आपल्या इच्छा न ठेवता काम करून स्वतःच्या हिमतीवर मिळवतो आणि खर्च करतो ! म्हणून सगळे नावजतात ! पैसा असेल त्यालाच इथे किंमत आहे हे कायम ध्यानात ठेव .
त्याच बोलणं ऐकून मला आपण किती जरी गरीब असलो तरी आपण श्रीमंतीचा आव अनुच शकत नाही केव्हा ना केव्हा भांड उगड पडतच त्यांने हे दाखवून दिलं ! पण त्याने स्वतःहून ह्या गोष्टी सांगितल्यावर त्याची माझ्या मनातील असलेली श्रीमंती आज आकाशाला ठेकली होती . एका एकी तो चांगला वाटू लागला आणि त्याने मला त्याच्या धंद्यांत घेतलं !
त्याच्या सोबत काम करताना सुरवातीला काही कळलं नाही ! इकडून पाकीट तिकडे जाऊन घ्याची  आणि त्यापाठीमागे हजारो रुपये मिळवायचे ! हे मला काही समजलं नाही पण ह्या पाकिटमध्ये असत तरी काय  हे काही समजलं नाही ? कित्येकदा अस्लम ला मी विचारलं तर त्याने ते टाळल !
मी जास्तीच डोक्यात न घेता शांत गप्प काम करत राहिलो , अत्ता माझ्याकडे बक्कळ पैसे होते ? आई ला कित्येकदा प्रश्न पडला की तू पैसे कोठून आणतोय एवढे ? पण मी म्हणालो एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळाली आहे असं सांगून तिला शांत करायचो ! तशी माझी बहिण अनघा आत्ता वीस वर्षाची झाली होती तिच्या साठी एक चांगला मुलगा बगून तीच लग्न मी थाटामाटात लावून दिल अत्ता ती सुखी आहे तिच्या सासरी ,
असंच एकदा काम करत असताना दरोजी प्रमाणे मी पाकीट घेऊन मरिन ड्राईव्ह वरच्या रस्त्यावर कस्टमरची वाट पाहू लागलो ! इकडे तिकडे बगत असताना एक अज्ञात गृहस्थाने मला धक्का दिला आणि पाकिटमधील सगळी वस्तू खाली पडली आणि त्यात फक्त मिठासारखा पांढरा कलर असणारी वस्तू होती मी रागात त्याला म्हणालो तुझ्यामुळे चुतीया माझ्या हाजारो रुपयांची वाट लावलीस असं बोलत त्यांच्या अंगावर मारण्यासाठी हाथ टाकला तेवढ्यात माझा हाथ चुकवत तो खाली झाला आणि मरीन ड्राईव्ह वरच्या रात्रीच्या वातावरणात त्याचा हाथ त्या पाकिटावर पडला आणि त्याच्या हाताला वस्तूचा त्या स्पर्श झाला आणि तो उठत त्याच्या वास घेत ! माझ्याकडे बगू लागला
आणि मी त्याला विन्यकारण शिव्या देत होतो !
तो वास त्याच्या लक्षात येताच त्याने मला न काही विचारता अशी एक खानाखाली वाजवली मी तिकडेच बेशुध्द पडलो !
सकाळी  उठल्यावर मी पोलीस ठाण्यामधील जेल मध्ये होतो , आणि मला मारणारे गृहस्थ पोलीस निरीक्षक : प्रल्हाद के पाटील होते
त्यांनी मला ड्रग विकणे या केस खाली पकडलं होत आणि मला ते मान्य नव्हत ! (माहीत नसल्या कारणाने )
जाग येताच आई पोलीस ठाण्यात पोलीस साहेबांच्या पाया पडत हंबरडा फोडत होती
ते बगून मी पटकन उठून उभा राहिलो आणि पाटील साहेबांना बोलू लागलो मला आत का टाकलंय साहेब ! अग ... आई .. मला आत का टाकलंय बग ना? अंग आई.... ऱ्यांना सांग ना मी काही ... ही केलं नाहीये !!! अंग आई ... साहेब मी काही नाही केलं ! मी कोणाचा खून नाही केला चोरी नाही केली तरी मला आत ....त का ठेवलंय ( बोलत बोलत माझी जीभ अटकळत होती आणि माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते ) मला.... ला .... मला सांगा सांगा ना ? काय झालं ! आये ... आई..... ग ! बग ना तुझ्या वासराकडे ! बग .... बग ..ग .. बग की की ! आई ..... ... आई हे मला मारून टाकतील ग आई आई आई !!! ( असं हंकारी देत तो मांडीत तोंड खुपसतं आई... आई ..... !! वाचव ना आई .... म्हणत बसतो )
आईच आणि साहेबांचं बोलणं चालू होत ! काय केलं माझ्या पोरानं! सांगा ना साहेब.... सांगाना !!!
साहेब म्हणाले की तुमच्या मुलाकडून काल रात्री मी जेवणानंतर व्यायाम साठी फिरत असताना, दोनशे ग्रॅम ड्रग्स सापडले आहेत !
( आईची ईस्कटलेले केस विचित्र आवाज चेहरा दुःखी पाहवत न्हवता) नाही.....  माझा मुलगा अस काही करणार नाही नाही !! म्हणत तिला चक्कर येते ! आणि ती खाली खोसळते ! तेवढ्यात साहेब तिला खुर्ची वर बसवत पाणी पिण्यास देतात आणि तिला शांत करतात , हे बगा बाई ! तुमच्या मुलाकडे आम्हाला ही नशेसाठी वापरली जाणारी वस्तू सापडली आहे आणि त्याच्याकडून आम्ही अजून काय काय सापडतय याचा आम्ही शोध घेत आहोत! यात अजून कोण कोण सामील आहे ?? हे आम्हाला कळायलाच पाहिजे , हे दुर्लक्ष करण्यासारखी बाब नाहीच आहे .
माझा मुलगा अस काही करणारच नाही तो एका चांगल्या कंपनीत कामाला आहे ? विचारा हवं तर त्याला ?
साहेब खुर्ची वरून उठून जेल च्या बंदिवासापशी येतात आणि म्हणतात काय रे आई म्हणतीयेते ते खरं आहे का ??
(मी काही न बोलता वर तोंड करून खाली आणि परत बगतो )
तेवढ्यात साहेब "तावडे" म्हणून हाक मारतात तावडे असा एक अंगाने भळीष्ठ असलेला हवालदार तो जेल मधून आत येतो त्याला बगुन माझा अंग कापू लागतं त्याचा जाड हाथ हाथात एक कंडा आणि पकडलेली लाठी बगता बगता माझ्या अंगावर ती लाठी पडते आणि माझ्या तोंडून आई हा शब्द अप्सक बाहेर पडतो ! आई बाहेरून गैयावैया करू लागते ! स्वप्नील .... साहेब .... अस म्हणत आपले अश्रू काडत राहते !
तावडे नि मारलेली लाटी लागताच माझ्या पॅन्ट ओली होते ! तावडे हसत बाहेर येत साहेब आणि बाकीच्या हवालंदारांना सांगू लागतात ! बेट्याच्यात काही दम नाहीये बग आजकालची पोरं खाईत तर काहीच नाही पण असले धंदे करायला सुचत कोठून म्हणत बाहेर निघून जातात आणि तेवढ्यात आई माझ्या नावाने आटापिटा करू लागते बापाचा नाव धुळीत मिसळलस र !!!बाप अत्ता असता तर त्याच्या बंदुकीची गोळी तुझ्यात पहिला टाकला असता !
साहेब आई ला शांत करत बाई शांत व्हा ! शांत व्हा ! बगू ?
तरीपण आई पुटपुटत असते साहेबांचं डोकं धरत ( दुखत ) म्हणून साहेब जोरात ओरडून  "बाई शांत व्हा"आई आवाज ऐकताच शांत होते  ! आणि म्हणतात ,अत्ता केस लिहून घ्याला पाहिजे बाई ! शांत पणे नाव सांगा मुलाचं.
स्वप्नील निरंजन देशपांडे .
नाव ऐकताच साहेब ! बोलतात का... काय?? 
तुम्ही कॅप्टन निरंजन देशपांडेच्या पत्नी का ?
आई लगेच " हो ' म्हणाली तसे ते गर्वाने म्हणाले !
कॅप्टन साहेब माझ्या बरोबर एकदा संचारबंदी वेळी लोकांना पळण्यासाठी  मोठया साहेबानी त्यांचं नाव सुचवलं होत आणि त्यावेळी ते सुट्टी ला म्हणून आले होते आणि आम्ही पोलीसवाल्यानी त्यांना कामाला लावलं ! तसा काय माणूस तो !त्याच्या एका शकलीमुळे आज या नोकरीवर मी ठिकून आहे , त्यांचे उपकार फेडण्यासारखं नाही ! ते कुठे असतात हल्ली ! मागच्यावेळी तर काश्मीर मध्ये होते गेली दहा वर्षे काही संपर्क नाही त्यामुळे अत्ता कुठे असतात काय असतात माहीत नाहीत ! तुम्ही सांगा  ! अरे !!! अरे ! मी विसरलोच एवढ्या मोठया सैनिकांच्या पत्नी पहिल्यांदा आलात आणि मी चहा देखील विचारला नाही ! ( आई तिचे अश्रू लपवत स्तब्ध बसली होती ) सखाराम मॅडम साठी चहा घेऊन ये ! मस्त एकदम कडक !!!
मगा पासून वाईट वागल्याबद्दल सॉरी ह! हे आमचं पोलिसगिरी म्हंटल्यावर असं आम्हाला वाईट वागावं लागतच पोटच पोरं जरी असं काहीतरी केलं असत तर काठी तुटू पर्यंत त्याला हाणला असता ! ( आई त्यांच्याकडे मोठे डोळे करून बगू लागली )
हा ! तुम्ही काहीही काळजी करू नका ! आत्ताच तुमच्या मुलाला बाहेर काढतो !
तावडे !!! नवीन केसची फाईल बंद करा आणि याला बाहेर काढा ! (तावडे बोलत म्हणत "एकदा म्हणतंय आत टाका एकदा म्हणतंय बाहेर काढा" साहेबांच्या नावाने बोंबलतो तेवढ्यात साहेब त्याच्याकडे बगतात ) तावडे !!!! ( तावडे शांत होऊन बाहेर जातो )
बस पोरा बस ! काय नाव म्हणालास ???
मी मंद स्वरात घाबरत " स्वप्नील "  अरे मग घाबरतो काय बस अत्ता मी तुझ्या बाबांचा मित्र निघालोय ना ? अत्ता मी काहीही तुला करणार नाही बस खाली ! ( खुर्ची माझ्याकडे सरकवत )  हा तर मॅडम मी म्हणत होतो काय करतोय ओ हल्ली निरंजन साहेब ! बॉर्डर वर त्याच जीन हराम करून टाकलं असेल दहशतवाद्यांनी काय सारखी न्युज पाहून वाईट वाटत ! काश्मीर ला दोन शाहिद वैगेरे !!!
पण काय करणार आम्ही नुसती न्युज बगायची खरे शिपाई  देशाच्या बाहेर रक्षण करत असतात आपलं ! आम्ही आतली गंधगी साफ करायची एवढच ( माझ्या कडे हाथ करत बोलतात , आई बगताच ) हा मॅडम चहा आला बगा ! घ्या चहा ! काही बिस्कीट वैगेरे हवेत ....,  हा हा हा हा हा हहहह हा ! हसतात ( आम्ही शांत बसलेले बगून पुन्हा शांत होतात )
हा तर मी म्हणत होतो !
तेवढ्यात मी म्हणालो "म्हणत नाही सांगत होतात" ?
पोरगं निरंजन साहेबांन सारख हुशार आहे बगा मॅडम ? अगदी त्यांचावर गेलाय .
तर मी सांगत होतो विचारत होतो साहेब काय करतात ! हल्ली ???
आई माझा हाथ पकडत गच्च साहेबाना म्हणते ते वारले  दहा वर्षांपूर्वी शहीद झाले देशासाठी ! ( अस बोलताचं पाटील साहेब आपली टोपी काढतात आणि टेबलावर ठेवतात आणि डोळ्यातून पाणी काढतात ) आई हंबरडा फोडून रडू लागते ! तसा दारा अडून ऐकत असलेला हवालदार तावडे त्याच्या डोळ्यात नकळत पाणी येत आणि मी एका कॅप्टन च्या पोरावर हाथ उचलला असा म्हणत ते माझ्या समोर येऊन आपले हाथ जोडतात ! मी त्यांना सावरत अहो तुम्ही माझ्यापेक्षा मोठे तुम्ही अस वागणं शोभत नाही .
तावडे म्हणाले, माफ करा मला !
अहो मला दुःख कश्याच वाटलं नाहीच  शेवटी तुम्ही तुमचा कर्तव्य बजावण्यासाठी साठी मारलंत आणि मी हे चुकी केलीच होतीच पैशाच्या मागे लागून नको नको ते उद्योग करू लागलो होतो ! तावडे काका आज खऱ्या अर्थाने तुम्ही माझ्यासमोर हाथ जोडून माझे तुम्ही डोळे उगडले ! सॅल्युट तुमच्यासाठी ( तो त्यांना सॅल्युट करतो आणि सगळ्यांच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात)  स्टेशन मध्ये सगळे वर तोंड करून आवाज करत , कॅप्टन निरंजन देशपांडे अमर रहे ! अमर रहे ! अमर रहे !!!! 
आज खऱ्या अर्थाने मुलाला मी संभाळताना मी फक्त माझं काम आणि दोन वेळच जेवण कस मिळेल याचाच विचार केला ! माझ्या मुलाला काय हवं काय नको हे मला समजलंच नाही अनघा बिचारी संसाराला लागली ! पण ह्या अश्या वाईट कृत्यातून स्वप्नील बाळा तुन माझे डोळे उगडलेस आणि तुला देखील एक चांगलाच धडा मिळाला !
पाटील साहेबानी त्यांची केस मागे घेतली , एका जुन्या मैत्रीची त्यांनी परतफेड  समाजकार्य रुपात केली मला शिकवण देत त्यांनी केस मागे घेतली ! ( आणि पोलिसांसमोर एक आदर्श ठेवला )
कधीही गरिबी मुळे कोणाला काय करावं लागल सांगता येत नाही  ! आपली इच्छा पालकांपुढे नक्की मांडत चला जेणेकरून असले गुन्हे वाढणार नाहीत !
आज स्वप्नील ने अस्लम ला देखील सुधारून त्याच्या बरोबर एका पोलीस स्टेशन मध्ये नोकरी मिळवली आणि ती दोघे मिळून समाजकार्य करतात आणि गुन्हा व्ह्याच्या आधी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करतात .
(कथा आवडल्यास नक्की कळवा अथवा कथे मध्ये काही चुकी असेल तर ती सुधरायला आवडेल .आपली प्रतिक्रिया नक्की कळवा )

32 

Share


राकेश इंगवले
Written by
राकेश इंगवले

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad