कधी कधी आपल्याला चालायचं नसतं
अन् पायाखालची वाट चालवत राहते
कधी कधी आपल्याला उडायचं नसतं
अन् आभाल मात्र सततंच खुणावत राहते...
नसतं पोहचायचं ध्येयापर्यंत
पण ध्येय कुठे आपल्याला विसरत असते
तसं तरं आपल्याला कुठंचं जायचं नसतं
पण आयुष्य मात्र उगाच पलवतं राहते
तसं तर कारण स्वर्गीय असेल तर
नरकात पण चालता येते
पण जगण्याचं कारणचं संपल तर
आयुष्य मनाला खेलवत राहते
तशी तर प्रत्येकचं लढाई जिंकता येते
पणं प्रश्न अस्तित्वाचा असेल तरं....????
-श्वेता शेलार।