रोजसारखाच आजचा दिवस घरातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यात्यांच्या कामात व्यस्त होते.., मी पण माझ्याच रोजच्या कामात माझ काम म्हणजे काय तर,मोठ्यांच्या दृष्टीने काहीही तथ्य नसलेल्या गोष्टीवर त्यांच्याशी चर्चा करणं म्हणजेच वाद घालण .... असच पप्पांसोबत सुरू होत ...तेवढ्यात पप्पांनी मोबाईल मागितला आणि एखादा bio-data आला आहे का wp ला बघायला लावलं ..पाहिलं आलेला होता सोबत मुलीचा फोटो होता सुंदर साडीत ...हेही काही अजचच नव्हत नवीन कायमचंच तुमच्यासाठी ही हे काही नवीन नसावं bio-data वैगेरे...
पण मन कुठं आपल थाऱ्यावर झाले लोकांच्या दृष्टीने पोरकट आणि वेडसर असणारे विचार सुरू....
एखादी व्यक्ती जिने त्या मुलीला प्रत्यक्षात पाहिलेलं नाही कधीच..ना तिला भेटलेत ...ना तिला वयक्तिक ओळखता अशी व्यक्ती A4 size कागदाच्या चौकटीत बांधलेल्या तिच्या माहितीवर जी माहिती जात पडताळणीच्या कागद बनवायला जातो तिथं सुद्धा जीच्याहुन जास्त माहिती आपण देतो अशी info आणि साडीत ला एक फोटो जो ती मुलगी संस्कारी असल्याचा पुरावा देतो लोकांच्या दृष्टीने हे अशा ठिकाणी पाठवतो की तिथं ही सारखीच अशीच परिस्थिती ....आणि एक नवीन नात जोडल जात.....
या कागदाच्या जीवावर ज्यामधे रास दिलेली असते पण तिथं कोणत्या परिस्थिीतीत त्या दोघांनी कस वागावं त्यांच्या अपेक्षा काय असतील ते नसतं दिलेलं ते काय ज्योतिष आहेत का रास बघून आयुष्य सोबत काढतील तर....
त्या कागदावर गण दिलेलं असतो शिक्षण दिलेलं असत पण त्यांच्या सवयी त्यांच्या आवडी निवडी दिलेल्या नसतात त्यांचा इंटरेस्ट काय आहे ते दिलेलं नसतं..पूर्ण खानदान चे नाव असता आत्या मामा भाऊ बहीण काका मावशी सर्व नातेसंबंध ....पण त्या मुलीने किवा मुलाने सुद्धा त्यांना प्रत्यक्षात क्वचितच पाहिलेलं असत फ्कत आणि त्यांच्या ओळखिवर यांचं नातं जोडलं जातं.....प्रत्येक bio-data वर कुलदैवत च नाव आवर्जून असत जन्म वेळ जन्म तिथी सर्व काही up-to-date असत पण कधी कोणत्या bio-data वर मुलगा निर्व्यसनी आहे कीवा त्याला हे हे व्यसन एखादी वाईट सवय आहे असं असत का हो...अजून एक नवीन ट्रेंड सुरू आहे यात इंजिनिअर मुलाला इंजिनिअर च मुलगी हवी म्हणजे ते सुखाने संसार करतील पण त्यांनी इंजिीअरिंग करावी हे तरी त्यांनी कुठं ठरवलेले असत तुम्ही त्यांचं शेड्युल सारखं राहील म्हणून लग्न लाऊन देता पण संसार करायला schedule आणि profession नाहीतर मन सारखे हवे असता.....प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या चांगल्याच बाजू लोकांसमोर मांडतो आणि त्यावरून अनोळखी व्यक्ती अनोळख्या व्यक्तीसोबत लग्नासारखे पवित्र नाते जोडून देतो एका कागदाच्या एका फोटोच्या आणि 2 भेटीच्या जोरावर ......आणि नंतर सांगतात अरेंज मॅरेज सक्सेस होत ..होत ही असेल खूप वेळेस नंतर त्यांचे मन जुळले तर...पण बरीच अशी नाती समाजाच्या भीतीने त्यांचे आयुष गुदमरून घुटमळून काढत जगतात......
शिवाय आपल्याकडे लग्न म्हणजे 2 जिवांच नसत तर 2 कुटुंबाचं असत सर्वांसोबत adjust करावं लागत शिवाय मग पुढे यातून निघत नही तेवढ्यात मुला बाळांच आहेच तेही समाजाच्या भीतीने 2 वर्षात व्हायलाच हवं नाहीतर नवरा बायको च अजून जमत नसेल का .., मुलीला प्रो. असेल का काही, मुलातच कमी असेल काही...अशा अनेक चारित्र्यावर संशय घेणाऱ्या गोष्टी कानावर यायला लागतात...नंतर काय जमल तर संसार आणि नही जमल तरी संसारच बरका..आपल्याकडची रीत आहे मुलगी 2 पायांवर माहेरातून गेली तर सासऱ्हून 4 खांद्यावरच यायचं हे divorce वगैरे सुसंस्कृत घरात नाही चालत इज्जत पण काही आहे का नाही..... बरोबर आहे का नाही
मनातलं काहीतरी वाटल म्हणून लिहिलं काही पटेल काही नाही पटणार कदाचित ही नाण्याची एकाच बाजू असेल..
पण हे आपल्या पोरकट विचारात येऊ शकतं तर मोठ्यांनी पण जरा विचार करायला हवा ना.....
-manraji