Bluepadएक कन्यारत्न..🙎
Bluepad

एक कन्यारत्न..🙎

ऋतुजा चव्हाण..
27th Sep, 2020

Share

मी मुलगी, मी एक कन्यारत्न... दाटणाऱ्या ढगांची निळीशार शाई मी बरसणाऱ्या पावसाची हलखी सर मी गुलाबी थंडीतील उबदार पांघरूण मी मी मुलगी , मी एक कन्यारत्न... रामाची सीता मी, पतिवृत्तेची अविस्मरणीय मूर्ती मी कृष्णाची राधा मी, प्रेमाचं निरंतर प्रतीक मी उदारमतवादी स्त्रीत्वाचा गौरव मी मी मुलगी, मी एक कन्यारत्न... घराची लक्ष्मी मी, देशाचा आधास्तंभ मी कर्तृत्वाचा आलेख मी, सौंजण्याच प्रतीक मी स्नेहशिलते ची खाण मी, सामाजिकतेच भान मी मी मुलगी ,मी एक कन्यारत्न... आईची अखंड सावली मी, वडिलांची लाडकी मी भावाची बहीण मी ,पतीची अर्धागिणी मी समस्त समाजाचा आधार मी मी मुलगी मी एक कन्यारत्न ऊन ही मी , वाराही मी समुद्राच्या तुफान लाटेच दर्पण ही मी पृथ्वीवरील समस्त मानवी अस्तित्वाचं कारण ही मी इतकं सर्व असतानाही शोषणाची बळीही मीच पुरुषांच्या हातातील बोलकी बाहूली ही मीच सुखाची खाण मीच अन् दुखाचेः ही कारण मीच ही दूषण माझ्यासाठीच का हाची एक निरुत्तर करणारा प्रश्न?

22 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad