Bluepad | Bluepad
Bluepad
व्यक्त होताना....
Words World
Words World
27th Sep, 2020

Share

चंद्र नभातूनी निघतांना,सूर्य सांजेला मुकतांना....,
अल्लढ या वेड्या मनाशी हितगुज करत होते मी..,
आज स्वतः कडेच व्यक्त होताना........
आशांन माझ्या पायदळी उडवत.,
परक्या अपेक्षांसाठी स्वतः लाच विसरलेली मी..,
मोकळ्या मनाने हे सार मांडत होते मी..,
आज स्वतः कडेच व्यक्त होताना....
बापाची लेक झाली,नवऱ्याची बायको झाली..,
लेकरांना मायेची सावली दिली...
यात कुठंतरी दुमडलेली माझ्या अस्तित्वाची पाने.,
अलगद उलगडत होते मी...,
आज स्वतः कडेच व्यक्त होताना......
@wordsworld374
माझ्या असण्याला अर्थ आहे.,
माझ्या वाटण्याला अर्थ आहे...
अर्थाला या माझ्या बेअर्थ करत आले मी..,
मांडते ही फिर्याद मी..
आज स्वतः कडेच व्यक्त होताना......
घुटमळलेल्या या क्षणांची.,गुंतलेल्या या भावनांची..,
एक एक गाठ सोडवताना...,
नकळत कागदावर शब्दांची माळ ओवत होते मी.,
आज स्वतः कडेच व्यक्त होताना.....
-manraji

20 

Share


Words World
Written by
Words World

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad