Bluepadमुलगी... वटवृक्षाची सावली मी
Bluepad

मुलगी... वटवृक्षाची सावली मी

ऋतुजा चव्हाण..
27th Sep, 2020

Share

आज जागतिक कन्या दीन, सर्वांना मनापासून शुभेच्छा!! काय बोलावं मुलींविषयी अर्थातच प्रश्न पडला अन् वाट्ले खूप काही आहे की बोलण्यासाखं म्हणून मग लिहायला घेतल. अर्थात आजच्या काळात अपवादही असतील यात काही प्रश्न नाही.पण ओळख तर झाली पाहिजेना मुलींची.आज नव्याने ओळख करून घेऊ या ! कारण खूप काळ लोटला चुलमुल करणाऱ्या मुली जगाचे नेतृत्व करू लागल्या. यानंतर मुलींविषयी , स्त्रियांविषयी चे भूरपुर मतभेद दूर होण्यास मदत होऊ लागली. तरीपण पुरुषप्रधान असलेल्या या संस्कृतीत आपले कर्तृत्व चे बीज रोवणे सोपे नव्हते पण हे करून दाखवले काळाच्या ओघात येणाऱ्या काळाबरोबर झगडत हे बदल होत गेले हे सोपे नव्हते ना आजही ते सोपे आहे. अनेक पिढ्यांच्या गतवासाने हे शक्य झाले. रूढी परपरां यांना छेद देत हे शक्य झालेे. अजूनही हा संघर्ष हा काही घरात सुरूच आहे . म्हणून तर मुलींना आजही कसरत करावी लागते. सर्व घराला सांभाळत करणे तिला अवघड जात पण ती करते.आजही समाजात काही मुलीचे नेतृत्व अफलातून असते. त्यांची सफलता पाहून सार्थकता वाटते. अनेक मुलींना सर्वच सांभाळून शिक्षण घेणं अवघड जात यावेळेस आईवडिलांनी तिला लहानपणापासूनच कणखर बनवायला हवं.केवळ बोलकी अन् सुंदर बाहुली न बनवता तिला मुलासाखे नेतृत्व करायला शिकायला हवं . यामुळे तिचा नंतरचा काळ सुखद अन् खंबीर जाईल.कोणतीही गोष्ट ती लग्नानंतरही त्याच हिमतीने करेल इतकीच शक्ती तिला द्या.केवळ शिक्षण म्हणजे चार पुस्तके वाचणे इतकेच तिचे जगणे मर्यादित करू नका. समाजातील अनेक चांगले वाईट अनुभव तिला सांगा जेणेकरून ती कुठे अडणार नाही. अनेक गोष्टी अगदी तिच्या आरोग्य सबंधित असो आणखी काही असो तिला मोकळे पणाने सांगा. तिचे सर्वात चांगले मित्र मैत्रीण बना मग बाहेरची अपेक्षा का बर करेल ती!!! इतकेच काय ते आपले सांगणे🤗

17 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad