Bluepad | Bluepad
Bluepad
मनातले कपाट....
डॉ अमित.
डॉ अमित.
27th Sep, 2020

Share


मनातले कपाट....
मनातले कपाट....


हळूच किलकिले केले मी
मनातले बंद कपाट इतक्यातं
दुःखाच्या दाटीवाटीत त्यात
सुखं पहुडले होते कोपऱ्यातं..

काही जुन्या आठवणी होत्या
ज्यात होते बालपणं माझे लपलेले
मोरपिसागतं भासल्या मज त्या
मी त्यांना होते अगदी मायेने जपलेले...

काही स्वप्नें होती भविष्याची
सोबतीला होती जिद्दं ती पुरी करण्याची
हातात हात घेवून दोघे एकमेकांची
वाट पाहत होते माझ्या नव्या उमेदीची..

काही रुस़वे होते काही फुग़वे
उगाचच करत होते जे मनावर ओझे
घालवता दूर फटकारून त्यांना
मन काय हलकें फुलकें झाले माझे...

काही नातीं होती जपलेली
काही रक्ताची नि काही मैत्रं जडलेली
उसवली होती मात्र वीण काहींची
तर काहींत होती गर्वाची गाठ पडलेली..

वरचष्मा होता दुःखाचा जरी
सुखाच्याही वाहत होत्या काहीं सरी
दु:खाकडे दुर्लक्ष मी करून मुद्दामचं
सुखाला मायेने घेतले जवळ माझ्या अंतरी.

मनातले कपाट सांगत होते मला आज
आवरत जा अधून मधून सारखे मज
नाही होणार मग कधीही या मनात
दुःखाची जळमटे राग द्वेष यांचा गजबज..डॉ अमित.13 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad