Bluepadप्रेम💝
Bluepad

प्रेम💝

शब्दगंध💞
शब्दगंध💞
26th Sep, 2020

Share

शब्दात नाही सांगता येणार
डोळ्यातुन समजून घेशील ना
सगळे खोटे ठरवतील मला
तेव्हा विश्वास माझ्यावर
ठेवशील ना...
चुकले मी असे वाटले ना
तर हक्काने मला सांगशील ना
कितीही भांडलो आपण तरी
समोर आल्यावर सगळे विसरून
जाशील ना...
मला तुझी गरज आहे
हे न सांगता ओळखशील ना
तुझ्यासाठी मी सगळ्यांपैकी एक असेल
माझ्यासाठी तु एकच
असशील ना...

25 

Share


शब्दगंध💞
Written by
शब्दगंध💞

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad