Bluepad | Bluepad
Bluepad
चला...! थोडी आपण पण मेहनत करून बघू.👍
shankar bodkhe
shankar bodkhe
26th Sep, 2020

Share

नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन विषयावर बोलणार आहोत .मित्रांनो लेख आवडल्यास शेयर करायला विसरू नका.
तर मित्रांनो आपना सर्वांना एक प्रश्न नेहमी पडत असतो की आपण जन्म कशासाठी घेतलात....??आपण या पृथ्वीवर जन्मला कशा साठी आलोय,,,,,तर या प्रश्नाचं उत्तर अस आहे की आपण काहीतरी साद्ध करायला आलो आहोत. आपण या समाजच काही देणं लागत आहोत.जीवनात प्रत्येकाच काही नाहीतर काही स्वप्न असतं की मला जीवनात काहीतरी करायचंय. काहींना डॉक्टर व्हायचं असतं काहींना इंजिनिअर तर काहींना व्यवसायात आपला ठावठिकाणा मांडायचा असतो आणि काहींना राजकीय क्षेत्रात आपलं स्वतःच अस्तित्व निर्माण करायचा असतं. प्रेत्यकाच एक ध्येय असतं. ते ध्येय साध्य करत असताना खूप अडचणी येतात बऱ्याच संकटाचा सामना करावा लागतो,निंदानालस्ती करणाऱ्याला तोंड द्यावे लागते हे काही नव्याने सांगण्याची गरज वाटत नाही. आणि या सगळ्या संकटातून जात असताना आपल्याला एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या समाजात आपले हितचिंतक, पाठ थोपटणारे पण खूप असतात मार्ग दाखवणारे पण खूप असतात दिशा दाखवणारे दिशा दाखवणारे मार्ग दाखवणारे पण खूप असतात दिशा दाखवणारे दिशा दाखवणारे असतात त्यांच्या अनुभवावरून वेळोवेळी सावध करणारे पण असतात पण असतात...पण या ठिकाणी आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ती म्हणजे कितीही हितचिंतक असले मार्गदर्शक आसले आणि आपण जर ध्येय प्राप्तीसाठी जर धडपड करत करत नसलो तर या सगळ्या गोष्टींचा काहीच उपयोग नाही..
म्हणजेच पाठ थोपटणारे कितीही असले, मार्गदर्शन करणारे कितीही असले आणि आपण जर मेहनत करण्यात चुकार पणा केला कष्ट केले नाहीत,तर आयुष्यात आपली स्वप्ने ही फक्त स्वप्नेच राहतील..या वरून माझा एक अनुभव सांगतो.
पावसाळ्याचे दिवस चालू होते.कालच पाऊस पडून गेला होता.नदी, नाल्याला पूर आला होता. विहिरी काठोकाठ भरल्या होत्या.मी आणि माझे दोन मित्र शेतात गेलो होतो.त्यादिवशी आम्ही खूप आनंदी होतो.शेतात गेल्यावर शेजारचे काका तिथे बैलं चारत होते. आणि एक बैल चरता-चरता एक बिनकाठच्या विहिरीत पडला...त्या विहिरीच्या काठावर काकांनी पाणी घेण्यासाठी एक दांड केला केला होता तो बराच मोठा होता.साधारण 2 फूट खोल आणि पाच ते सहा फूट रुंद.तर त्या बैलाचे समोरचे दोन पाय त्या दंडात आणि मागचे दोन पाय विहिरीत.असल्या अवस्थेत तो तिथे पडून होता.त्या काकांना काय करावे काहीच कळेना. मग त्यांनी बैलाच्या शिंगात कासरा घातला आणि ओढण्याचा प्रयत्न केला.पण काही करता तो बैल बाहेर निघत नव्हता..तो बैल बाहेर निघण्यासाठी धडपडच करत नव्हता..परंतु शेवटी त्या काकांनी त्याच्या खांद्याला डिवचले त्याला खवळन्याचा प्रयत्न केला आणि जेंव्हा तो बाहेर येण्यासाठी धडपड कडू लागला आणि तितक्यात आम्ही कासरा ओढला की लगेच बैल बाहेर निघाला...
यातुन मला एकच गोष्ट सांगायची आहे की जीवनात जर काही मिळवायचे असेल तर तुम्हाला स्वतःला कष्ट करायचे आहे..कष्ट करण्याची जर तुमची मानसिकता नसेल तर आयुष्यात तुम्ही काहीच मिळऊ शकत नाही.......
मित्रांनो लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका....👍

31 

Share


shankar bodkhe
Written by
shankar bodkhe

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad