Bluepadचंद्र आणि ती
Bluepad

चंद्र आणि ती

Neha Joshi
Neha Joshi
26th Sep, 2020

Share

पाहता तुला आज हि , आठवे ती मला
तुही लाजशील हळूच , जर पाहिलेस तिला ....
हास्य तिचे तुझ्यासम ,सुरेख , रमणीय , ललित
सजून येते समोर जसा नटतो आसमंत ...
तुझे प्रतिबिंब पडता सारस तर चमकतेच
पण तिने त्यात पाहता सरोज हि फुलते ..
तिच्या सौंदर्याने सगळा
अंधार दूर झाला ,
म्हणूनच ,
पाहता तुला आज हि , आठवे ती मला
तुही लाजशील हळूच जर पाहिलेस तिला ....
तुझ्या येण्याने निशा धुंद झाली पण
तिचा स्पर्श होता रातराणी हि फुलली
चंद्र , शशी , हिमांशू , मयंक , अनेक नावे तुला मिळाली
यामिनी , कौमुदी , मोहिनी , रश्मी , अशी तिची रूपे मला त्याच रात्री कळली....
तुझ्या आजूबाजूस फक्त चांदणच तर चमकत
पण , तिच्या येण्याने निसर्गात सगळंच मोहरत..
तू आणि ती अगदी सारखेच आहात बघा कारण ,
तुम्हा पाहता मला प्रेम म्हणजे काय ते समजत ..
चंद्रमा म्हणजे साक्षात तू समोर असूनहि
मला फक्त तिच्यावर अनुराग झाला ...
म्हणूनच,
पाहता तुला आज हि , आठवे ती मला
तुही लाजशील हळूच , जर पाहिलेस तिला ....
तुही लाजशील हळूच , जर पाहिलेस तिला ....

31 

Share


Neha Joshi
Written by
Neha Joshi

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad