Bluepadशोध...
Bluepad

शोध...

ऋतुजा चव्हाण..
26th Sep, 2020

Share

शोधतेय मी जीवनाचं अंतिम सत्य मिळतील का मला प्रश्नांची उत्तरं काळाबरोबर पुढे आलेल्या घटनांचे करू शकेल का मी आकलन काळच आहे म्हणून सरतोय म्हणा पण काळाच्या ओघात हुरहूर लावून जातोय खरा किती खोल आहे जीवनाचं रहस्य या जन्मात तरी समजेल का बरं नकळत घडले म्हणून किती द्यायचे सोडून सापडतेय म्हणून किती शोधायचे अजून भास मनाचे किती जपायचे म्हणून आठवणींना तरी का जवळ करायचे अजून शोध ही बनलेली काळाची गरज कुठे नेऊन ठेवणार बरं तुम्हा आम्हा सारख्यांना किती तोडणार अजून धरणीमातेची विटंबना कधी संपणार बरं प्रश्न सुटावे म्हणून वाचायचे प्रचंड का प्रश्नात च गुरफटून हरवून जायचं खरं जगण्यासाठी पैसा कमवायचा का पैशासाठी सर्व काही गमवायच हा एक गहन प्रश्न शोधावे किती स्वतः ला या शिक्षणाच्या बाजारात का एक दिवस आपण ही लुप्त होणार या महाकाय जगात आत्महत्येचे पातक कधी संपणार मानवी मनातून जीवनाचे महत्व कधी समजणार कोणास ठाऊक अजूनही शोधतेय मी जीवनाचं सत्य एक दिवस ते उभ राहील माझ्या पुढ्यात समाधान देईल मला ते निरंतर मृत्यूलाही आलिंगन देण्यास तोपर्यंत जगण्याची मिळू दे प्रेरणा जीवनाची खरी किंमत कळू दे मला हीच असेल जर जिवंतपणाची किमया तरच आम्हा खरी माणसे म्हणा!!!

15 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad