Bluepadहर कुत्ते का एक दिन....जरूर आता हैं.
Bluepad

हर कुत्ते का एक दिन....जरूर आता हैं.

डॉ अमित.
डॉ अमित.
25th Sep, 2020

Share


हर कुत्ते का एक दिन....जरूर आता हैं.

आता तुम्ही म्हणाल मी हे शीर्षक का दिले या लेखाला?तसे पाहता ही 'म्हण' रोजच्या जीवनात प्रत्येकाच्याच ऐकण्यातं किंवा वापरण्यात आली असेल... खरं तर अगदी सकारात्मकतेने या म्हणी कडे पाहण्याचा आपला दृष्टीकोन असायला हवा....कोणी आपल्याकडे तुच्छतेने किंवा हीनतेने पाहत असेल तर आपण त्याला आपल्यात असलेली पूर्ण क्षमता दाखवून एक ना एक दिवस आपले ध्येय गाठू शकतो...आपले वेगळेपण सिद्ध करू शकतो असेच या म्हणीतून सुचवायचे आहे...
पण बऱ्याच वेळेस याचा नकारार्थीच अर्थ घेतला जातो...
कुत्रा हा त्याच्या ईमानदारी साठी त्याच्या कर्तव्य दक्षतेसाठी जाणला जातो...त्याच्यात असलेल्या उत्तम 'वास' ओळखण्याच्या क्षमतेमुळे....
पोलिसांसाठी गुन्ह्याचा तपास लावण्यासाठी...याचा खूप उपयोग होतो...आता वैद्यकीय क्षेत्रातही यापूर्वीही कॅन्सर,मलेरिया या आजारांच्या स्क्रिनिंग साठी बऱ्याच देशांनी कुत्र्याच्या या शक्तीचा वापर केला आहे...
सध्या कोरोना जगभरात आपली दहशतं फैलावत असताना त्यावर रोज काही ना काही नवीन संशोधन होत आहे...याच संदर्भात एक संशोधनं सध्या खूप चर्चेचा विषय आहे...
फिनलंड देशातील 'हेलसिंकी' या शहराच्या
हवाईतळा वर...काही स्निफ़र कुत्री विशेष प्रशिक्षित करून त्यांचा उपयोग कोरोना चे स्क्रिनिंग करण्यास सुरुवात केली आहे.
सध्या अशी चार कुत्री वापरली जात आहेत. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांच्या घामाने पुसलेले वाइप्स... टिश्यू पेपर एक वेगळ्या बॉक्स मघ्ये ठेवून ते बॉक्स इतर सेंट असलेल्या बॉक्स मध्ये एकत्र ठेवले जातात...जर व्यक्ती कोरोना संक्रमित असेल भले त्याच्यात काहीही लक्षणे नसतील तरीही ही कुत्री त्या पेपर च्या वासावरून हे ओळखू शकतात...तेंव्हा ही कुत्री वेगळ्या पद्धतीने 'भुंकतात' वा आपले 'पाय आपटतात' वा 'जमिनीवर लोळतात'...मग अश्या व्यक्तीची कोरोना टेस्ट केली जाते...अशी कुत्र्यांनी निवडलेले सर्व च्या सर्व व्यक्ती टेस्ट मध्ये पॉझिटिव्ह आल्या.
म्हणजे या प्रयोगाची सेन्सिटिव्हिटी शंभर टक्के आहे...सध्या वापरात असलेल्या "आरटी पिसीआर" पेक्षाही आधी याचे निदान होवू शकते...
याचा उपयोग आपण मोठे मॉल्स,गर्दीची ठिकाणे याठिकाणी प्रायोगिक तत्त्वावर नक्कीचं करू शकतो..या साठी एक मिनिटांपेक्षा ही कमी वेळ लागतो...अगदी दहा सेकंदात ही कुत्री घामाच्या वासावरून हे ओळखू शकतात...आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कुत्री या आजारापासून मुक्त राहू शकतात कारण त्यांच्यात कोरोना ला जखडून ठेवणारे रिसेप्टार्स नसतात...त्यामुळे त्यांच्या मार्फत हा आजार पसरण्याचा धोकाही राहत नाही.

मला वाटतं आपल्या सारख्या लोकसंख्येने जास्त असलेल्या देशात मोठ्या प्रमाणात कोरोना ची स्क्रिनिंग करण्यासाठी नक्कीच हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर करण्यास हरकत नाही....याला जर आणखी यश मिळाले तर कोरोना चे संशयित रुग्ण लवकर ओळखून या 'महामारी' ला आपण आटोक्यात आणू शकतो..
शेवटी निसर्गाने या जगात प्रत्येकाला एक वेगळेपण बहाल केलेलं असतं.. मग तो मनुष्यप्राणी असो वा इतर प्राणी असो.गरज आहे ते ओळखून त्याचा संपूर्ण जगाच्या फायद्यासाठी योग्य वेळी योग्य प्रकारे वापर करण्याची...मग तो कुत्रा का असेना..शेवटी त्यानेही त्याचे वेगळेपण जपले आहेच की?
ही न्यूज ऐकुन मला वाटतं कुत्र्यांनाही
"कृत्य-कृत्य" झाल्यासारखे वाटतं असणारं....
आणि मनातल्या मनात भुंकत ते म्हणत असणारं...
हर कुत्ते का एक दिन...जरूर आता हैं?

हो की नाही?

डॉ अमित.

34 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad