Bluepadएक अजनबी हसीना से....फिर मुलाकात हो गयी..
Bluepad

एक अजनबी हसीना से....फिर मुलाकात हो गयी..

डॉ अमित.
डॉ अमित.
24th Sep, 2020

Share


एक अजनबी हसीना से....फिर मुलाकात हो गयी.

शीर्षक वाचून काय येतंय मनात? डॉक्टर प्रेमात बिमात पडले की काय या वयात पुन्हा?नक्की कोण भेटली आहे मला आयुष्याच्या या वळणावर? असाच काही विचार चाललाय ना तुमच्या मनात?...आता सांगतोच तिच्या बद्दल...राहवेना अगदी.😂😂 (मलाही आणि तुम्हालाही..हो की नाही?)

ती म्हणजे कोणी व्यक्ती....सुंदरी..किंवा प्रेयसी नसून ती आहे आपली स्वतःचीच दुसरी बाजू... तुम्ही म्हणाल आता हे काय नवीनच?
आपली स्वतः ची दुसरी बाजू जी आपल्या प्रत्येकाला असते परंतु ती बऱ्याच वेळेस आपल्या दुर्लक्ष करण्याने आपल्यासाठी अनोळखीचं राहिलेली असते,अपरिचित राहिलेली असते.
या संसाराच्या रहाट गाडग्यात,पाहिलेली स्वप्नं पूर्ण करण्याच्या धडपडीतं जणू ती धूळ खात पडलेली असते..
तुम्हाला जर तिला भेटायचे असेल,तिला जाणायचे असेल तर सर्वात प्रथम तुम्हाला करायचे असलेले महत्वाचे काम म्हणजे तुम्ही स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे....जसं जसे तुम्ही स्वतः साठी वेळ देवू लागता तेंव्हा त्यावर साठलेली ही धूळ,अनोळखी पणाचा पडदा दूर होवू लागतो...

याची सुरुवात तुम्ही रोज कमीत कमी दहा मिनिटे न चुकता एकांतात बसून करायची आहे.अगदी काहीही न करता...या काहीही मध्ये अंगठ्याचा व्यायाम जो तुम्ही किंवा आपण सर्व जणचं थोड्या थोड्या वेळानं न चुकता करत असतो...(मोबाईल वर करत असलेल्या बोटांच्या व्यायमाबद्दल बोलतो आहे मी..😂😂)सुरुवातीला थोडे अवघड वाटेल असे काहीही न करता निवांत बसणे पण एकदा का याची गोडी लागली....की मग हे नक्कीचं जमेल.आणखी एक महत्वाचे म्हणजे हे सर्व करण्यात तुमची मोलाची मदत करते ती गोष्ट म्हणजे तुम्ही करत असलेला रोजचा योगाभ्यास आणि प्राणायाम.या दोन गोष्टी तुमची तुमच्या स्वतःशी एक वेगळीच युती निर्माण करतात.

याने तुम्हाला,तुमच्या मनाला एका वेगळ्याचं शांतीचा अनुभव येईल..तुम्ही तुमच्या स्वतःशी संवाद साधू शकाल...तुमचा हा तुमच्या स्वतःशी होत असलेला संवाद.... 'स्व-संवाद',सुसंवाद म्हणा हवे तर, तुम्हाला तुमच्यात दडलेल्या बऱ्याच छोट्या छोट्या काही चांगल्या गोष्टी..ज्या तुमच्या हिताच्या आहेत या उलगडू शकण्यात मदत करतो...तुमच्यातल्या काही नकारात्मक गोष्टी तुमच्या निदर्शनात आणून त्या टाळण्यासाठी तुम्हाला सहकार्य करू शकतो...तुमच्या मनात दडलेल्या सुदंर कल्पनांना मूर्तिमंत रूप देण्यासाठी तुम्हाला प्रोत्साहन देतो...तुमची तुमच्या स्वतःच्या नव्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच ओळख करून देतो...

वो अक्स हैं मेरी...या हैं मेरी परछायी
लगती हैं हसीना सी मुझे,जो अबतक थी शरमायी..

हो ना...जेंव्हा तुम्हाला तुमच्या या दुसऱ्या बाजूचे दर्शन होते...तेंव्हा तर तुम्ही तिच्या प्रेमातचं पडता... ती तुम्हाला एखाद्या सुदंर हसीनां...प्रेयसी सारखीचं जणूं भासू लागते...तुम्हाला तिला परत परत भेटण्याची जणू ओढचं लागते...तुम्हाला तिच्या वाचून करमेनासे होते...तुम्ही तिच्यात अगदी गुंतून जाता..
यामुळे होते काय की तुम्ही स्वतःवर प्रेम करू लागता...तुम्ही स्वतःला जपू लागता...तुम्ही स्वतः ची काळजी करण्या पेक्षा स्वतः ची काळजी घेवू लागता. स्वतःस कधीही कमी न लेखता तुमच्यात दडलेल्या सुप्त गुणांना तुम्ही वाव देवू लागता...जीवनात येणाऱ्या दुःखाच्या प्रसंगात बावरून,घाबरून न जाता अगदी तठस्त पणे त्यांना धीराने सामोरे जाऊ लागता.

हो सर्वात महत्वाचे म्हणजे तुम्ही स्वतःला कधीच आणि कुठल्याही परिस्थितीत एकटे समजत नाही...
अलिप्तपणा,एकलकोंडेपणा तुमच्या जवळ फिरकुही शकत नाही..आजकाल ताणतणाव उदासीनता नकळत चोर पावलाने प्रत्येकाच्या आयुष्यात डोकावूं पाहत असते..तुमचे हे सुंदर आयुष्य नकळत पोखरू पाहत असते...मग कदाचित याची परिणीती म्हणून काही जण एकदम कोलमडून जातात,काही जण व्यसनाच्या आहारी जातात तर काही अगदी जीवनाला कंटाळून एकदम टोकाचा निर्णय घेत हे मौल्यवान जीवन संपवून टाकतात..
हे जर टाळायचे असेल तर तुम्हाला या तुमच्यात दडलेल्या हसीने सोबत "एक मुलाकात" नक्कीचं करायलाच हवी.. तिला जवळून जाणायलाच हवे...मग पहा तुमचे जीवन कसे आतून बाहेरून नाविण्याने बदलून जाते,बहरून जाते...

इक मुलाक़ात में, बात ही बात में जिंदगी का यूँ मुस्कुराना गज़ब हो गया....

कल तलक वो जो मेरे ख्यालों में थी रूबरू उसका आना गज़ब हो गया...

मग भेटायचे ना तुम्हाला तुमच्यात दडलेल्या या "ड्रीमगर्ल" ला.... हसीना ला? चला तर मग माझ्या सोबत तुम्हीही हे गाणे गुणगुणत हे जीवन आनंदाने आणि नव्या जोमाने जगा...

एक अजनबी हसीना से....फिर मुलाकात हो गयी.
फिर क्या हुवां ये ना पूछो..कुछ ऐसी बातं हो गयी..

डॉ अमित.

29 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad