Bluepadपावसानंतरचा... पाऊस.
Bluepad

पावसानंतरचा... पाऊस.

डॉ अमित.
डॉ अमित.
23rd Sep, 2020

Share


पावसानंतरचा... पाऊस.


हा पाऊस पण ना लहरीचं असतो
कधी कधी एकदम अतीचं करतो
बरसतो बरसतो बरसतच् जातो
मग पाहत नाही तो त्याच्या डोळ्यांनी
शेतकऱ्याचे मातीमोलं होत असलेलं स्वप्नं
दिसत नाही त्याला गरिबांच्या
जलसमाधी मिळत असलेल्या झोपड्या
त्याच्या संततधार समोर लुप्तं होतात
भोगलेल्या लोकांच्या डोळ्यातले अश्रूही
घामाने सिंचूंन तरारलेले उभे पीक
क्षणातं आडवे करण्यातला असुरी आनंद
भेसूर वाटतो मग कोसळण्याचा त्याचा छंद
फिका पडतो पहिल्या पावसानंतरचा मृदगंध
पुरामुळे प्रेत झालेल्या शरीराचा सुटतो दुर्गंध
का असा वागतो तो कधी कधी मुद्दामच्
वाटते मग भीती त्याच्या अस्तित्वाची
उडतो थरकाप मनाचा होते गाळण शरीराची
अरे पावसा नको ना तू अती करत जाऊ
गरजेपुरतेच बरसत जा नको असा अंत पाहू....


डॉ अमित.

16 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad