Bluepadनियती.... मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे.
Bluepad

नियती.... मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे.

डॉ अमित.
डॉ अमित.
22nd Sep, 2020

Share


नियती.... मी ओळखून आहे, सारे तुझे बहाणे.


मला माहित नाही...माझ्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे ते...मला काय कोणालाच ते माहीत नसते....नव्हे ते माहीत नसनेच किती 'उत्कंठापूर्ण' असते...जे जे तुमच्या आयुष्यात घडत असते ते रोज नावीन्याने नटलेले असते... नवचैतन्याने बहरलेले असते. ते चांगले असो वा वाईट...पण बऱ्याच वेळा वाईट घटनेचाच संबंध या नियतीशी जोडला जातो...नियती कशी क्रूर,ती आपली थट्टा कशी करते हे आणि असे बरेच काही नियतीशी जोडले गेलेले असते.

व. पु. म्हणतात तसे… माणसाला जन्माला घालण्या मागे त्याला छळावे एव्हढीच फक्त नियती ची इच्छा नसते, ती प्रत्येकाला काही ना काही देऊन पाठवते…. बाकी आपण मिळवायचे असते.
आता परवाचीच दिल्ली आणि पंजाब या दोन संघातली आयपीएल ची मॅच.....इंग्रजी मध्ये एक म्हण आहे, "If anything can go wrong,It will go wrong" ही म्हण पंजाब टीम साठी

आणि

"If anything can go right, It will go right" ही दिल्ली टीम साठी जुळणारी अशी म्हण.

ह्या दोन ओळी अक्षरशः याची शब्दशः प्रचिती देतात.हातातोंडाशी आलेली मॅच हातातून जाणे आणि जवळ जवळ हारलेली मॅच परत जिंकणे याचा उत्कंठापूर्ण आणि थरारक अनुभव काल सर्वांनी याची देही याची डोळा घेतला.

"न समजावे कमी जिला कधीही इति...नियती"

ही नियती या शब्दाची फोड मला अतिशय समर्पक वाटते,मनाला भावते.
पण या नियती चा संबंध फक्त वाईट गोष्टीशीच जोडणे मला अगदी चुकीचे वाटते.
खरं तर मला हे नियतीचे सुंदर असे बहाणेच वाटते...जी पदोपदी तुमच्याच हिताचा निर्णय घेत असते...कधी तो तुम्हाला पटतो कधी पटत नाही इतकेच.कसे ते मी तुम्हाला सांगतो.
एखादी वाईट गोष्ट,तुम्हाला त्रास देणारी गोष्ट,तुमच्या मनाविरुद्ध घडलेली गोष्ट जर तुमच्या आयुष्यात होत असेल..तर नियती तुम्हाला त्यातून बऱ्याच गोष्टी शिकवून जात असते...तुम्हाला कणखर असते बनवणे...तुम्हाला जीवनातल्या सर्व 'खाच-खळग्यांचा' अनुभव देवून तुमचे आयुष्य अधिक परपक्व करणे,तुम्हाला तुमच्या झालेल्या चुकांतून योग्य असा बोध देणे इतकाच तिचा हेतू असतो...
मग नियती देत असलेल्या या शिकवणी ला एक मार्गदर्शक फलका प्रमाणे समजुन त्याचे वेळोवेळी पालन करणे खूप महत्वाचे असते...नाही का?

शाळेतल्या प्रत्येक इयत्तेचे जसे काही नियम ठरलेले असतात अगदी तसे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचे म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक इयत्तेचेच म्हणा ना काही नियम ठरलेले असतात...या नियमांचे जो प्रत्येक टप्प्यावर पालन करतो तो नियमित...नियतीच्या इयत्तेत अव्वल येतो....
आणि दुसरे असे की,
जो आपली 'नियत' म्हणजे आपला 'हेतू' शुद्ध ठेवतो..तिलाच ही नियती आपलं सकारात्मक दर्शन देते...पण जर या नियमांना आपण छेद दिला तर नियती मग आपल्याला तिची नकारात्मक छटा दाखवते... तिला तुम्हाला व. पु. म्हणतात तसे छळायचे-बिळायचे काहीच नसते मात्र तिला तुम्हाला वेळीच सावध करायचे असते.
( आता सावध सावधान समय असे ओरडून भटजी जेंव्हा लग्न मंडपात उभ्या असलेल्या नवरदेवाला पुढील संसाराच्या संभाव्य धोक्याची कल्पना देतो. अगदी तसे म्हणा हवेतर😂😂😂)

या नियातीला इंग्रजी मध्ये डेस्टिनी...
DESTINY असे म्हणतात....
डेस्टिनी ची शाब्दिक आणि अर्थपूर्ण अशी उकल मी तुमच्या समोर मांडू इच्छितो....

D...Do your duties honestly..
तुमचे प्रत्येक काम प्रामाणिक पणे करा
E...Engage in good work everytime
नेहमी सत्कार्य करण्यावर भर द्या
S...Smile a while.
जीवनाला हसून सामोरे जा
T....Try to maintain relationship.
नाती जपण्यावर भर द्या
I....Improvise yourself everytime
नेहमी स्वतःमध्ये काही ना काही सुधारणा करत
रहा.
N...Never underestimate yourself..
स्वतःला कधीच कमी लेखू नका....
Y...Be Youthful alway..
नेहमीच चैतन्याने भरलेले रहा..मनाने तरुण रहा.
जेंव्हा तुम्ही नियती कडे "डेस्टिनी" च्या या परिभाषे प्रमाणे पाहता... आणि त्याप्रमाणे तुमचे वर्तन ठेवता तेंव्हा नियतीलाही तुम्हाला हवे ते आणि हो अगदी तुम्हाला हवे तेंव्हा द्यावेच लागते.... तेंव्हा ती कुठलेही सबब पुढे करू शकत नाही.

मग आपणही तेंव्हा अगदी ठणकावून म्हणू शकतो..नव्हे जोरजोरात गाऊ शकतो,

"शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती
नाही आम्ही झुकणार कधी काय करणार ही नियती"


डॉ अमित.
. . . . . . . . . . . . .


16 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad