Bluepad | Bluepad
Bluepad
लग्न आणि नाक
तेजल
21st Sep, 2020

Share

आमची मुलगी आमचं नाक आहे, असं ऐकल्यावर मुली वास आणि respiratory चं काम कधी पासून करायला लागल्या असा प्रश्न मला पडला. बरं, तुमच्यासाठी करत असतील त्या हे कार्य पण बाहेरच्यांना का सांगताय तुम्ही हे ओरडून.. oh! Hold on. इतरांच्या मुलींनी त्यांच्या स्वतःच्या मर्जीने लग्न केलं म्हणून acidity झाली का? पण आता काय करणार ..नसतात त्या नाक किंवा पोट, त्यांच्या त्यांच्या घरच्यांचं.. आणि तुमच्यासाठी शरीराची कामं करायला नसतील त्या रिकाम्या.. मग त्यात फार वाईट वाटून घेण्यासारखं काही नाहीये किंवा तुमच्या चांगलं फंक्शन करणाऱ्या नाका बद्दल गर्व वाटू देण्यासारखं सुद्धा काही नाहीये. कारण ,तुमच्या साठी नेहमीच चांगलं  काम करणाऱ्या नाका सोबत मात्र कधी कधी तुमचा तुक्का चुकतो ना!.. (हो कधी कधीच चुकतो, कारण लग्न लव असो की अरेंज तुक्केच असतात, लागला तर लागला)..
पण मग मुलं मुली स्वतःचा निर्णय योग्य ठरल्यावर स्वतःला स्वतःचं नाक असल्याचं घोषित करत नाही, मग हे बाकीचे त्यांच्या वर का बरं भारी भरत असतील? मुळातच हा खूप चाऊन चोथा झालेला विषय आहे, तरी लिहायची, वाचायची भूक काही जात नाही.. कारण, लिहलेले न वाचणाऱ्यांमध्ये याला त्याला नाक बनवणारे आहेत. जोपर्यंत ते हे अब्रू चे धिंडवडे काढणारे लेख वाचत नाही तोपर्यंत हे shameless लिखाण डोळ्यांसमोर येत राहणार.. इतके कॉमेडी विषय असतात हे, त्यामुळे तसंच लिहून सादर करावे लागणार.. आणि वाचकांना वाचावे लागणार..
तुमच्या नाकाबद्दल तुम्ही निर्णय घ्यायला चुकले तर करणार का कबूल की आम्ही मात्र respiratory आणि सुवास देऊ शकलो नाही. म्हणून..
खरंतर किती अवघड आहे लग्न संस्था.. randomly एका घरी तुम्ही मुलीला पाठवतात.. मित्र मैत्रिणी, कपडे, रंग असं सगळंच चोखंदळपणे निवडणाऱ्या त्या.. कोणत्या माणसांना डील करायचंय हेही माहीत नाही, जेव्हा माहीत होतं तेव्हा फक्त नाकाचे कार्य आहे म्हणून पार पाडायचे असं मानून फक्त पार पाडत राहणार.. वर नाही पाडलं तर नाक कापूनही तुम्ही मात्र श्वास घ्यायला मोकळे.. म्हणजे किती खोटी अब्रू आहे तुमची..
लहानपापासूनच मुलाला मुलीसारखं सगळं शिकवलं तर मोठं होऊन आई वडिलांचं बघणार कोण.. हा प्रश्न उपस्थित होणार नाही.. जर आता मुली जॉब करून, घरचं बघत असतील तर मुलंही बघू शकतात.. याची त्याची मने जपण्या पेक्षा नवरा बायको सोबत राहून , सणावाराला हवं त्या घरी किंवा कुठेच नाही गेलं तरी चालतं.. हल्ली नवरा बायकोे मध्ये पूर्वीपेक्षा चांगली compatibility असते, त्या मुळे हे खूप सोप्पं होऊ शकतं..

21 

Share


Written by
तेजल

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad