Bluepad | Bluepad
Bluepad
शिवनेरी गड.... मनात घर केलेला गड.
डॉ अमित.
डॉ अमित.
21st Sep, 2020

Share

शिवनेरी गड.... मनात घर केलेला गड.
शिवनेरी गड.... मनात घर केलेला गड. छत्रपती शिवाजी महाराज....नुसते नाव जरी उच्चारले तरी रोम रोम पुलकितं करणारे व्यक्तिमत्वं...हे नुसतं नावं नाही तर संपूर्ण शब्दकोश आहे वीरतेचे शोर्याचे,बुद्धीचातूर्याचे,गनिमीकाव्याचे, मातृ भक्तीचे ,देशप्रेमाचे....अश्या या वीर पुत्राचा जन्म झालेले ठिकाण म्हणजे शिवनेरी.. एक तीर्थक्षेत्र जणू.....शिवतीर्थ. १९ फेब्रुवारी १६३० हा आपल्या शिवबांचा जन्मदिवस. मातीचाही इथल्या झाला टिळा धन्य आहे इथली एक एक शीळा जन्म पाहिला महापुरुषाचा ज्याने शिवनेरी हा गड आहे खूप आगळा जुन्नर शहराच्या जवळ असलेला हा शिवनेरी किल्ला पुण्यापासून एक दिवसाचं फक्त पर्यटन नसून इतिहासाला सत्यात उतरवणारा अनुभव आहे. तसे तर अगदी अचानक घड'लेली ही गड भ्रमंती....गड किल्ले तर मला खूप आधीपासूनच साद घालतात....मलाच फक्त काही ना काही कारणाने या त्यांच्या साद ला प्रतिसाद द्यायला उशीर होतो.. अथांग समुद्रात पसरलेला सिंधुदुर्ग, मुरूड चा जंजिरा,महाबळेश्वर जवळचा प्रतापगड आणि आता हा शिवनेरी...एक एक किल्ला हा इतिहासाचा आरसाच जणू. गडकिल्ले संवर्धनाच्या उपक्रमात आमूलाग्र बदललेला शिवनेरी किल्ला नक्कीच आपल्या सर्वांना आपल्या इतिहासाची,महाराजांच्या शौर्याची गाथा सांगत राहतो... गडावर असलेली हिरवाई....स्वच्छता नक्कीच आपल्या मनात घर करते...शिवरायांचे झाडांप्रती असलेले प्रेम इथे असलेल्या आज्ञापत्रात शब्दा शब्दांत प्रतीत होते.... लेकराची दिली उपमा झाडाला दिसते दूरदृष्टी शिवरायांची जिथे जपावी झाडे वाढवावी जंगले मंत्र शिवरायांचा जणू घुमतो इथे गडावर पोहोचे पर्यंत सात दरवाजे ओलांडावी लागतात... मुख्य दरवाजा,मेणा दरवाजा,हत्ती दरवाजा,कुलूप दरवाजा आणि इतर तीन दरवाजे आणि इथे असलेला मोठा अंबरखाना....याला सात दरवाज्याची वाट असेही म्हणतात. गडावर दोन मोठी पाणी साठवण क्षमता असलेले तळे आहेत... जिजाऊ आणि शिवरायांची बालमुर्ती आहे...आणि हो शिवजन्म स्थानाचे प्रतीक म्हणून एक पाळणा देखील आहे.... इथल्या कणांकणांतून जणू शिवराय प्रकट होत असल्याचा भास इथे आल्यावर होत राहतो...म्हणुनच की काय 'शिवतीर्थ' हे नाव शिवनेरी गडाला साजेसे वाटतं राहते.. साधारणतः चार तास लागतात पूर्ण गड पाहायला...इथे असलेल्या भवानी मातेचे शिवाई देवीच्या रूपातील डोंगरातील मंदिरात गेल्यावर गड चढताना नकळत जाणवणारा क्षीण...क्षणात अंतर्धान पावतो. अशी आख्यायिका आहे की जिजामाता गरोदर असताना त्यांनी शिवाई देवीला नवस केला होता की मला जर पुत्ररत्न झाले तर तुझे नाव त्याला देईन..तसेच हा जो गड आहे त्याचा आकार शंकराच्या पिंडी सारखा आहे म्हणूनच या गडाचे नाव असे आहे... मला वाटतं आज प्रत्येकाने आपापल्या कुटुंबासोबत शिवरायांच्या या आणि इतरही किल्ल्यांना भेट देवून आपला इतिहास आपल्या येणाऱ्या भविष्यातील पिढीला आवर्जुन दाखवला पाहिजे.....कारण हा इतिहासच आपल्या येणाऱ्या पिढीचे भविष्य उज्वल करू शकतो...घडवू शकतो. हो की नाही? "जय महाराष्ट्र जय शिवराय." डॉ अमित.

36 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad