Bluepad | Bluepad
Bluepad
मनातली......स्वप्नं...
डॉ अमित.
डॉ अमित.
20th Sep, 2020

Share


मनातली......स्वप्नं...
मनातली......स्वप्नं.आवडेल मलाही पाऊस व्हायला
पाऊस होवून छानं रिमझिम बरसायला
बरसताना मोकळं होतात हे ढगं जसे
वाटतं मोकळं करावं या तुंबलेल्या मनाला...


आवडेल मलाही इंद्रधनुष्य व्हायला
सप्तरंगांची झालर या मनाला जोडायला
या सप्तरंगांची सोबत घेऊन जीवनात
हे आयुष्य ही इंद्रधनुसम सप्तरंगी करायला..


आवडेल मलाही लक्ष चांदण्या व्हायला
काळोखलेल्या आकाशात लखलखायला
एखाद्याचे अंधारलेले आयुष्य पुन्हा नव्याने
मी माझ्या परीने उजळून चमकवायला...


आवडेल मलाही सुमधुर संगीत व्हायला
त्याच्या सुरेल तालावर स्वतः ताल धरायला
सप्त सुरांच्या लहरींवर या मनाला बसवून
आयुष्याचे हे गीत नव्या उमेदीने गायला...


आवडेल मलाही कविता व्हायला
मोजक्या शब्दांत भावना व्यक्त करायला
शब्दं रसात चिंब होवून अनेकदा
कल्पनेच्या दुनियेची शब्दं-भ्रमंती करायला...


आवडेल मलाही स्वच्छंद पक्षी व्हायला
आकाशाला कवेत घेवून मनसोक्तं उडायला
नजर ध्येया समोर ठेवून हमेशा जीवनात
सदा तत्पर राहून उंच उंच झेपावयाला...


आवडेल मलाही स्वतःचाचं मित्र व्हायला
एकटे पणात नेहमी स्वतःला जपायला
मैत्रीचं खरं रूप अनुभवून स्वतःशीचं
आयुष्याचा प्रत्येक क्षणं समरसून जगायला..

डॉ अमित.

9 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad