Bluepad | Bluepad
Bluepad
जिंकू अथवा मरू 🤟
ऋतुजा चव्हाण..
18th Sep, 2020

Share

हो, मला माहित आहे आरोग्याबाबत आपण सर्व जण खूप जागरूक होत आहोत. आजच्या काळाची जणू गरजच बनली आहे ती! पण आता मात्र मन थोडसे वैतागत आहे . किती हो हा त्रास , नेहमी सुंदर तयार होऊन बाहेर जाणारे आम्ही या मास्कच्या जाळ्यात कसे अडकत गेलो आम्हालाही कळाले नाही. खरच बेफिकीर होऊन हुंदडणारे , मनाला येईल तेव्हा आणि कुठेही खाणारे पण आम्हीच होतो का असा प्रश्न पडलाय? पहाटे पडलेले एखादे स्वप्न खर होताना पाहतोय का असा भास होतोय. इतक्या प्रगतशील जगात आजही लस उपलब्ध होत नाही यावर क्षणभर विश्वास बसत नाही.कधी काळी सूक्ष्मजीव शास्त्र शिकताना विचार यायचा खरच इतके भयानक असता विषाणू आणि खरच त्यांच्या प्रसाराने मानवी जीवन खंडीत होऊ शकते. आज मात्र खात्री पटली मनाची , की या जगात काही पण होऊ शकते . मानवाने इतकी प्रगती केली की त्या प्रगतीलाच जणू मानवाची परीक्षा घ्यावीशी वाटायला लागली आणि त्यातूनच विषारी जीवाणू आणि विषाणूची उत्पत्ती झाली. जीवाणू आणि विषाणू आधी पण होतेच की भूतलावर. इतकंच नाही त्यांच्यापासून विशाल जीवाची उत्त्पती झाली मग आजच अस काय झालं की हे विषाणू आजच आपल्या जीवावर उठले. सांगण्याच तात्पर्य इतकेच की ही आपत्ती खरंच नैसर्गिक आहे की मानवनिर्मित. डायनासोर सारखे विशाल प्राणी भूतलावर होऊन गेले. ते आपले काही वाकडे करू शकले नाही तर काळाच्या ओघात नष्ट पावले. मग हा कोरोना आहे तरी काय ?आजच हे संकट मानवनिर्मितच दिसतंय त्यामुळेच की काय आजही त्यावर पर्याय मिळाला नाही. सांगावस तर इतकेच वाटते की जर अशी संकटे मानवाने निर्माण केली तर आपण जीवन जगायचं का याबरोबरच नष्ट व्हायचं. जगात माणसे सर्व प्रकारची पण डार्विनच्या सिद्धांताप्रमाणे जो बलाढ्य तोच जगेल हे भाकीत त्याने सजीवांसाठी केलं होत पण आज मानवासाठी विचारात घ्यावे वाटते. आजच्या या मानवाच्या स्पर्धेत जेव्हा निष्पाप लोकांचा जीव जातो ना तेव्हा मात्र पुन्हा इतिहासाची पुनरावत्ती होते की काय असे वाटते. आज प्रश्न आरोग्याशी जोडला गेला म्हणून वाटते की मानवी मनाला लाभलेली सामंजस्य, आदर, प्रेम, शांती ही जी जागतिक स्तरावर प्रतीके मानली आहेत त्यांना पुन्हा जाग येईल. मानवी मनात त्यांची पुन्हा एकदा उजळणी होईल तरच मानवाचं अस्तित्व भूतलावर टिकेल. नाहीतर मानवाचं अस्तित्व नाकारायला पण निसर्ग मागे पुढे पाहणार नाही. आज अस वाटू शकते की हे संकट आहे पण याला आव्हान समजून पुन्हा उभे राहू. जिंकू अथवा मारू पण खंबीरपणे लढू . पुन्हा उभे राहून देशासाठी जगू. शेवटी अस्तित्वासाठी संघर्ष आलाच! त्यामुळे न घाबरता कोरोनाच काय तर युद्ध , पूर, आर्थिक मंदी या सगळ्यांना सामोरे जाऊन देश विकासाची हमी देऊ कारण देशाच्या सीमांना देशवासीयांच्या मनाची संरक्षणात्मक भिंत आहे तेव्हा चीन च काय कोणीच आपल्याला हतबल करू शकत नाही.

38 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad