Bluepad | Bluepad
Bluepad
हे मनं..... बावरे.
डॉ अमित.
डॉ अमित.
18th Sep, 2020

Share


हे मनं..... बावरे.
हे मनं..... बावरे.हल्ली मनं उठ सुठ कशानेही
लगेच आपलं नाराज होत होतं
माहीत नाही का पण त्याचं
नक्कीच काहीतरी बिनसलं होतं...


म्हटलं थोडसं त्याला गोंजारू
काही हवं काही नको ते विचारू
तरीही आपलं त्याचं तेच पुराण
कळू देत नव्हतं याचं खरं कारण....


एकटं नव्हतं पण एकाकी होतं
रुसलं नव्हते पण हिरमुसलं होतं
रडलं नव्हते पण रडवेलं होतं
मनाला नक्कीचं काहीतरी बोचलं होतं


मग मात्र मी धीरानं घेतलं
मनाला काही क्षण मोकळं सोडलं
अनुभवलेल्या काही सुखदं आठवणींच्या
भूतकाळात त्याला अलगद नेलं..


आता त्याची थोडीशी कळी खुलली
मरगळलेली सुस्ती त्यानं झटकली
हरवलं होतं कदाचित कोणी जवळचं
आठवणीत त्यानं होतं ते पुन्हा मिळवलं


त्या आठवणींचे मी आभार मानले
खरं कारण त्याचं बावरण्याचं जाणले
घेतले वचन पुन्हा असं न वागण्याचं
त्यानंही कबुल केलं हसत खेळत जगण्याचं...डॉ अमित.

14 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad