Bluepad | Bluepad
Bluepad
हव्यास....की फक्त हवी हीच आस...
डॉ अमित.
डॉ अमित.
17th Sep, 2020

Share


हव्यास....की फक्त हवी हीच आस...
हव्यास....की फक्त हवी हीच आस.प्रत्येकाला वाटत असते की मला अमुक गोष्ट मिळावी,माझ्या कडे तमुक गोष्ट असावी.हे ना ते असे किती तरी भाराभार गोष्टींचे आकर्षण.कधी कधी हे आकर्षण इतके पराकोटीचे असते की त्याला हव्यास चे रुप प्राप्त होते.मग सुरू होते ती गोष्ट प्राप्त करण्यासाठीची केविलवाणी धडपड.
ती मिळवण्यासाठीचे वेग वेगळे मार्ग समोर दिसू लागतात.क्वचित् कधी त्या मार्गात गैर मार्ग मग डोकाऊ पाहतो.ह्या वेळी खरे तर उपयोगी पडते ती तुमची सदसदविवेक बुद्धी.जी तुम्हाला योग्य मार्गावर जखडून ठेवते त्याच्याशी जोडून ठेवते.
मान्य आहे की प्रत्येकाचे काहीं ध्येय असावे,काहीं स्वप्नं असावीत पण त्याची वास्तवाशी नाळ जोडलेली राहणे तितकेच महत्वाचे असते.


मी आणि माझी स्वप्ने दोन्ही
हातात हात घेवून चालतो
नजर ध्येयावर असते तरीही
पाऊल मात्र जमिनीवर ठेवतो

यामुळे होते काय की हवी ती गोष्ट प्राप्त करताना आपण प्रयत्नांची पराकाष्ठा जरूर करतो पण आपल्या आवाक्यात राहून आणि आपल्या कामाशी प्रामाणिक राहून.मग तो हव्यास न राहता आपल्याला हवी ती गोष्ट मिळवण्याची प्रामाणिक 'आस' होते.
ही आस मग तुमचा 'ध्यास' होतो आणि तुमची ध्येयपूर्ती ही एक 'ध्यान-साधना' होते.

हवे हवे मज हवे हवेते
कष्टाने नि प्रामाणिकतेने
नको नको जे नव्हते माझे
मिळेल माझे मला ते ईश्वर कृपेने


जर भावना आपण प्रत्येकाने जोपासली तर मग ना भावा -भावांची, ना मित्रा -मित्रांची,ना आपापसातील प्रत्येकाचे पैसे, इस्टेट, जमीन -जुमला किंवा अश्या बऱ्याच गोष्टीसांठी होणारे तंटे वाद शत्रुत्व कायमचे लोप पावेल.
माणूस माणूसच राहील त्याचे हव्यासापोटी हैवानात
रूपांतर होणार नाही.वर्तमान पत्रात डोकावणारे बरेच गुन्हे मग भूत काळात जमा होतील आणि वर्तमान पत्र खऱ्या अर्थाने वर्तमानात नांदतील आणि नकळत आपल्या भावी पिढीला भविष्याची उज्वल स्वप्ने पूर्ण करण्यास प्रोत्साहन देतील.

हे स्वप्नवत वाटतं असले तरी अशक्य मुळीच नाही.प्रत्येकाने याची सुरुवात स्वतः पासूनच करायला हवी,आजच करायला हवी.म्हणून तर मी म्हणतो आपल्याला 'हव्यास' पेक्षा हवी हीच आस की मी आज पासून, नव्हे आतापासून हे अंगिकरण्याचा अवश्य प्रयत्न करेन.माणूस म्हणून जगेन मी
इतरांशी माणूस म्हणूनच वागेन
हा ईश्वरी संकेत समजून मी
माझ्यातले माणूसपण जागवेन...डॉ अमित.20 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad