Bluepadमाझी शाळा....आठवणींचा पूल पुन्हा जोडताना.
Bluepad

माझी शाळा....आठवणींचा पूल पुन्हा जोडताना.

डॉ अमित.
डॉ अमित.
16th Sep, 2020

Shareमाझी शाळा....आठवणींचा पूल पुन्हा जोडताना.तुम्ही म्हणाल अचानक शाळा मला या वयात का आठवली?बरोबर ना?
तर मी म्हणेन आठवली नाही तर ती मनाच्या खोल कुपीतून हळुवार पुन्हा नव्याने अंकुरली. तब्बल पस्तीस वर्षे काळाच्या ओघात सरली....
पहिली ते चौथी माझा शाळेचा प्रवास.
नवीन मराठी शाळा,बार्शी.
इतके वर्षे झाली या गोष्टीला पण जिच्या नावातच नवीन आहे, नावीन्य आहे तिची कुठलीही गोष्ट जुनी कशी होईल?हो की नाही?
वयाला वार्धक्याचा शाप असतो असे म्हणतातं आठवणींना नव्हे.


नवीन मराठी नाव तिचे
आजही तरुण तिचे नावीन्य
भाग्य आमुचे ती आम्हां लाभली
नव्हे जणू हे तर आमचेचं पुण्यं


आजतागायत मी माझ्या शाळेच्या छायेतचं तर रोजचं जीवन जगत आलो आहे,नव्हे बहरतं आलो आहे.माझे घर शाळेच्या खूप जवळ आहे.असे म्हण ना की अगदी हाकेच्या अंतरावरच आहे.शाळेची वास्तू रोज जाता येता मला पाहत असते आणि मी तिला.
जणू ती मला रोज हाकचं देत असते.
शाळेची ही पवित्र वास्तू रोज तथास्तु म्हणुनचं माझ्या रोजच्या जीवनात मला आशीर्वादचं जणू देत असते आणि माझ्या इच्छा आकांक्षा ची पूर्ती करत असते असे राहून राहून मला वाटते.

इतक्या वर्षात माझ्या शाळेचा रंग मात्र थोडा जुना झाल्या सारखा वाटतं होता.हा जुना रंग माझ्या नवीन मराठी शाळेचं नावीन्य हिरावतो की काय असे वाटत असतानाचं एक आश्चर्याचा सुखदं धक्का बसला.काही दिवस झाले शाळेचे रंगकाम चालू असलेले दिसले.
शाळा हळू हळू जणू कात टाकत आहे की काय असे वाटू लागले.
सुरुवातीला भिन्न भिन्न रंगांची केलेली रंगसंगती थोडी डोळ्यांना वेगळी भासली.पण जसं जसे काम पूर्ण होत गेले शाळा पुन्हा नव्याने बहरू लागली.त्यात भरीस भर म्हणजे पूर्ण इमारतीच्या
मधोमध साकारलेला काळा फळा किंवा शाळेची पाटी म्हणा हवेतर....आणि त्या भोवती लिहिलेली मराठी आद्याक्षरे..पुन्हा शाळेचा वर्ग जणू शाळे बाहेर भरल्याचा भास झाला...मन पस्तीस वर्षे पुन्हा भूतकाळात मागे फिरले...रमले.

खूप सुंदर कल्पकता आज माझ्या शाळेने दाखवली.फळा काळा असतो पण तो साऱ्या विद्यार्थ्यांचे भविष्य मात्र उज्वल करतो.हेच जणू माझ्या शाळेची वास्तू आम्हाला पुन्हा नव्याने सांगू लागली.

आठवली मज शाळा आज
फळा काळा सावळां स्मरला
छडी लागे छमछमं चा स्वरं
कानांत पुन्हा एकदा रूणझुनला

आज आम्ही जे काही घडलो,जी आमची प्रगती झाली त्यात शाळेचा सिंहाचा वाटा आहे.
घरी कोणी पाहुणे आले किंवा बाहेर गावचे मित्र मंडळी आले तर आवर्जून मी माझ्या शाळेची वास्तू दाखवतो,तिची ओळख करून देतो.
आणि हे करत असताना माझा ऊर नकळतं आनंदाने नि आठवणीने पुन्हा भरून येतो.आठवणींचे गर्द धुके दाटले
शाळेचे मज पुन्हा वेध लागले
फिरुनी झालो आज लहान पुन्हा
आज मला पुन्हा बालपणं भेटले.डॉ अमित.

25 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad