Bluepadहाल कैसा है..........जनाब का?
Bluepad

हाल कैसा है..........जनाब का?

डॉ अमित.
डॉ अमित.
15th Sep, 2020

Share

हाल कैसा है..........जनाब का? हाल कैसा है जनाब का क्या खयाल है आपका  तुम तो मचल गये, ओ ओ ओ  यूँ ही फ़िसल गये, आ आ आ... चलती का नाम गाडी या "ओल्डी-गोल्डी" चित्रपटातील किशोर दा आणि आशा जी यांचे हे चुलबुले गाणे.... गाणे कसले हा तर शब्दांचा नुसता उत्सव जणू. सकाळी सकाळीचं मनाने या गाण्याचा ठेका धरला होता. एक वेगळाच निवांत मूड जाणवत होता... ...हो तुम्ही म्हणाल नक्की काय झालंय मला....खूप दिवसांपासून या कोरोना मुळे(आणि मास्क नावाच्या नव्या वस्त्त्रामुळे..हो ना त्याला आता रोजचेच वस्त्र म्हणावे लागतं आहे😂😂) गुदमरून गेलेल्या श्वासाने काल जणू मोकळ्या आकाशात एक वेगळेच नवचैतन्य अनुभवले होते... श्वासांनिही किती पाहा घेतला भला मोकळा श्वास मोकळे आकाश माथ्यावर सोबतीला हिरवा निसर्ग खास... परवा सहजच माझा मुलगा शर्विल बोलता बोलता म्हणाला पप्पा माझी परीक्षा उद्या संपतेय...घरात बसून बसून खूप कंटाळा आला आहे.. चल कुठे तरी जावूयात...अगदी माझ्या मनातलं बोलला होता तो...या भटकंतीच्या लागलेल्या सवयी मुळे इतक्या दिवसांत कुठेच न गेलेल्या या देहाला आणि मनाला एक वेगळीच उभारी आली या वाक्यामुळे...आणि हो आमची सेल्टॉस ची "किया"- देखील खुणावतं होती....क्यो इतने दिनोसे कही घुमने का कुछ भी प्लॅन नहीं किया?असे राहून राहून विचारत होती. पण हा कोरोना...काहीच तर करू देत नव्हता... तरीही मग इथे जवळचं रामलिंग....आमचे लहानपणापासूनचे हक्काचे आणि श्रद्धेचे पर्यटन स्थळ(लहानपणी पर्यटन या शब्दाची ज्याने गोडी लावली ते ठिकाण)...आम्हाला खुणावू लागले ..मग या छोट्याश्या ट्रीप ची छोटीशी तयारी करून आम्ही निघालो या जवळच्याच भटकंतीला... गावाची वेस ओलांडली आणि काय आश्चर्य वेसन घातलेला बैल वेसन तोडल्यावर जसे चौफेर उधळत जातो तसे हे मन वेस ओलांडल्यावर दाही दिशा कवेत घेवू पाहू लागले...या वर्षी अपेक्षे प्रमाणे पावसाचे सर्वच नक्षत्र पहिल्यांदाच वेळेवर बरसले होते...निसर्गही एका वेगळ्याच मूडमध्ये ताल धरत होता..निसर्गात रंगसंगतीचे एक वेगळेचं मिश्रण आकार घेत होते..धरतीवरील हिरवाई आकाशाच्या निळाई ला जणू आपल्यात सामावून घेऊ पाहत होती... पाऊस नुकताच पडून गेला होता....धरती चिंब ओली झाली होती... सूर्याची भिजलेली किरणे थोडीशी शहारतचं धरतीला ऊब देत होती. या चिंब धरती वरून मन निसरडे होवून सारखे सारखे निसर्गाच्या कुशीत घसरू पाहत होते.... वाटेत असलेल्या "निलकंठेश्र्वर" च्या मंदिरात शंकराच्या पिंडी समोर नतमस्तक होवून आम्ही पुढे रामलिंग च्या वाटेवर निघालो... गेल्या गेल्या रामलिंग...या रामाच्या चरण कमलाने पावन झालेल्या भूमीवर ....रामभक्त संकटं मोचन हनुमानाचे प्रतीक. ..म्हणजेच खूप साऱ्या वानरांचे दर्शन झाले....त्यांच्या पायऱ्यांवर असलेल्या फलटणी च्या गर्दीतूनच वाट काढत आम्ही रामलिंग च्या पवित्र आणि पुरातन मंदिरात प्रवेश केला.मनोभावे शंकराच्या पिंडी चे दर्शन घेतले,एक वेगळीच शांतता मनात घर करून गेली. पुढे तेथील सुंदर धबधबा आणि हिरवीगार वनराई यांच्या नैसर्गिक सोंदर्यात हरवून गेलो....वेळ कसा गेला कळलेच नाही. निसर्गाच्या कुशीत बसूनच मग आम्ही सर्वांनी सोबत घेवून गेलेल्या खाद्य पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेतला.. आजूबाजूच्या हिरवाई ने नटलेल्या निसर्गाला बघून....आमच्या पोटातील कावळेही.... काळा रंग सोडून निसर्गाच्या रंगात रंगीबेरंगी झालेत आणि या मिळालेल्या सप्तरंगा मुळे आनंदी होवून ते नेहमी पेक्षा जास्त कावंकावं असा जल्लोष करत आहेत असे मला वाटले.... पोटाची ही शमली भूक.. आसुसलेले मन हे झाले भावूक किती दिवसांनी पाहा आज अनुभवले हे निसर्गाशी नाते नाजूक... मला कायम "निसर्गाची साद" कानात रुंजी घालत असते.....पण कामाच्या या रहाटगाडग्यात...मलाच त्याला प्रतिसाद देण्यास उशीर होतो....पण जेंव्हा जेंव्हा संधी मिळेल तेंव्हा मी तो प्रतिसाद अवश्य देत असतो... कारण तुम्ही निसर्गाला दिलेला प्रतिसादच तुम्हाला मनाने कायम चिरतरुण ठेवत असते.. माझीच एक यापूर्वी लिहिलेली निसर्गावरची कविता पुन्हा या लेखात लिहिण्याचा माझा मोह मी नाही रोखू शकलो.... साद निसर्गाची.... आज कळी मला म्हणाली.... माझ्या संगे फुलतोस का इतक्यात गुमसुम दिसतोयस खरेच काही बिनसले का आकाशाची निळी नवलाई हळूच कुजबुजली कानात नको दडवू शल्य कुठलेही हो मोकळा सांगून तू क्षणात सप्तरंगी इंद्रधनुष्याची कमान उधळत होती रंग किती छान देऊ पाहत होती आयुष्याला माझ्या नव्या रंगसंगतीचे नवे परिमाण हिरवाईचे निसर्ग सभोवती चे मला खुणवत होते राहून राहून दूर कर मळवट उदासीचे तू घे जगून आयुष्य पुन्हा मनापासून असे कित्येक क्षण देतो आनंदाचे निसर्ग हे आयुष्य उलगडताना त्यास तुलाही साद द्यावी लागेल हे जीवन भरभरून जगताना.... तुम्हीही कायम तुमचे कान निसर्गाची साद ऐकण्यास सताड उघडे ठेवा आणि जमेल तेंव्हा निसर्गाच्या सानिध्यात जायची सुवर्णसंधी दवडू नका.मग पहा कसे तुमचे हे आयुष्य सप्तरंगाने उधळून निघते ....आणि तुमचे मन हे "निसर्ग-निसर्ग होते की नाही ते..आणि नकळत हे गीत गुणगुणू लागते ते.... हिरवा निसर्ग हा भवतीने जीवन सफर करा मस्तीने मन सरगम छेडा रे जीवनाचे गीत गा रे गीत गा रे धुन्द व्हा रे   नवे पंख पसरा उंच उंच लहरा   भिरभिरणारे गीत गा रे गीत गा रे धुंद व्हा रे..... डॉ अमित

21 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad