Bluepad | Bluepad
Bluepad
भेट पहिली
Sangieta Devkar
Sangieta Devkar
14th Sep, 2020

Share

ओला स्पर्श तुझा आणि स्मृतिगंध मातीचा,
अजून ही आठवतो तो पहिला पाऊस आपल्या भेटीचा.
आजही त्या भेटीत माझा अडकलेला श्वास आहे.
काही आठवांचे मोती मनात खास आहे.
तुझी ती बेदरकार नजर,ते श्वासाचे धडधडन,
वरून कोसळनारा पाऊस आणि घट्ट पकडलेला हात,
निसटू द्यायचे नवहते मला तुझ्या सोबतचे ते अनमोल क्षण.
चिंब भिजलेलो तू आणि मी,नजर एकमेकांत गुंतलेली.
ही आगळी वेगळी होती भेट आपली पावसात भिजलेली.
तुला आठवतो का रे तो पहिला पाऊस आणि मी?
का आज ही तसाच तू रुक्ष आणि तुज्यात असलेली मी.
कधी तरी भिजव मन तुझे माझयात आणि या पावसात,
समजून येईन तुला तू ,आणि तुझ्या साठी आसुसलेली मी.

संगीता देवकर...भेट पहिली

10 

Share


Sangieta Devkar
Written by
Sangieta Devkar

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad