Bluepadप्रमाणामध्ये सर्व काही असावे💯
Bluepad

प्रमाणामध्ये सर्व काही असावे💯

ऋतुजा चव्हाण..
13th Sep, 2020

Share

आजारी माणसाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याची अवस्था कावीळ झालेल्या माणसासारखी असते. सगळे माणसें त्याला पिवळी दिसायला लागतं. सांगायचं तात्पर्य हे की आजाराला पण कुठ पर्यंत गृहीत धरायच याचाही विचार करायला हवा .आजच्या काळात माणूस आरोग्याची प्रचंड काळजी घेतो. पण अगदी चोरपावलांनी आजाराचे आगमन होते अर्थात हे काही जादूने नाहीतर आपल्याच जीवनशैलीमुळे! नकळत आपण काही गोष्टी अश्या करतो ज्या केवळ नी केवळ ताणतणाव ला आमंत्रण देता. भविष्या विषयी चा ताण, कारोना काळातील परिस्थी, आरोग्य , व्यवसाय याविषयी आपण भयंकर काळजीत असतो.ही नाहक काळजीच रोगांना आमंत्रण देते. मला तर वाटतेय कोरोना काळ कदाचित आपल्याला वेळ देऊ पाहतोय, सगळ्यांना एकत्रित आणू पाहतोय याचा आपण विचार करायला हवा. जन्मल्यापासून सुरू होणारी धावपळ मरे पर्यंत संपत नाही. अगदी जातानाही माणसाला जणू इथले नियोजन लावूनच जायचं असते. किती साऱ्या गोष्टी आपण दिवाळी, उन्हाळ्यासुट्टीत पण करू शकलो नाही त्या आपण या काळात केल्या हा काळ आपल्याला खूप काही शिकवून गेला. कारण याच नियोजन कोणाच्याच हातात नव्हते. सहज बाहेर फिरायला गेलो. तेव्हा दोन माणसा तील सवांद एकला. त्यातील एकाला रक्तदाब न मधुमेह होता.तर तो सांगत होता मला तर कोरोनाची प्रचंड भीती वाटते . कोणाला हात लागला तरी ताण येतो . मग सहज विचार केला माणूस आतून किती पोखरला गेलाय .भीतीने माणसाची गाळण उडते. भीतीनेच माणसाला हतबल केलं आहे. कशाचीही भीती वाटते की लगेच ताण येतो.ताण एकटा येत नाही तर घेऊन येतो सोबत असंख्य व्याधी. याचा माणसाला मागमूसही नसतो. निरोगी समजणारा माणूस आपल्यालाच कामामध्ये इतका मग्न असतो की तो पर्यंत अतिविचार, ताणतणाव, भीती या शरीरावर ताबा घेता नी माणूस रोगांचा शिकार बनतो. प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत नी त्या आपण पाळायला पाहिजेत. कोणतीही गोष्ट प्रमाणातच करायला हवी. प्रमाणाबाहेरील गोष्टीचे परिणाम च आपण आज विविध रुपात भोगतोय. त्यामुळे आपण काळजी घेऊन विचारपूर्वक योग्य निर्णय घ्याला पाहिजेत.

8 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad