Bluepad | Bluepad
Bluepad
वृक्षवल्ली"....... जणू मायेची सावली.
डॉ अमित.
डॉ अमित.
13th Sep, 2020

Share


वृक्षवल्ली"....... जणू मायेची सावली.
वृक्षवल्ली"....... जणू मायेची सावली.काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचण्यात आली होती की एका घर मालकाला बांधकाम सुरू करण्यापूर्वी त्या ठिकाणी असलेले एक मोठे वडाचे झाड तोडावयाचे होते.
ही बातमी काही पर्यावरण प्रेमींना समजली.तेंव्हा ते वडाचे झाड तोडायचे नाही असा निर्णय त्यांनी घेतला. त्या ऐवजी ते न तोडता तेथून मुळापासून हलवून दुसऱ्या ठिकाणी एका क्रेन चा साहाय्याने पुन्हा लावण्यात आले.अशक्यप्राय असा वाटणारा उपक्रम मात्र आजच्या सायन्स च्या युगात मशिनरी च्या साहाय्याने ते सहज शक्य झाले.
ही घटना तशी आमच्या सोलापूर जिल्ह्यातली पहिलीच.
खूप स्तुत्यं उपक्रम आणि लक्षवेधी.
खरंच असा विचार जर प्रत्येकाने केला तर नक्कीच आपली "पृथ्वी" एक हिरवाईचं' 'नंदनवन' होईल...
वृक्ष हे जमिनीची झीज,धूप थांबवतात..जमिनीची भूजल पातळी वाढवतात...पावसाचे प्रमाण वाढवतात..प्रत्येक प्रकारे या जला चे जतन करतात. कारण हे जल...म्हणजे साक्षात अमृतच नव्हे का?..कदाचित म्हणूनच की काय पाणी हे लाकडाला कधीच बुडू देत नाही...त्याला नेहमी आपल्या शिरपेचात मानाच्या "मुकुटा" प्रमाणे तरंगत ठेवतात.

संत तुकारामांनी म्हटले होते वृक्षवल्ली, आम्हां सोयरे ...वनचरे.
पण आजकाल होणारी अमाप वृक्षतोड,नष्टं होत चाललेली खरी जंगलं आणि त्या ठिकाणी वाढणारी सिमेंटची जंगलं...खरंच किती क्रूर थट्टा करतो आहोत नाही आपण निसर्गाची.आपण असे वागून निसर्गाची चक्रे जणू उलटीच फिरवत आहोत.
कमी होत चाललेली भूजल पातळी,'आटतं' चाललेला पाऊस आणि 'तापत' चाललेली ही पृथ्वी जणूं आपल्याला येणाऱ्या धोक्याची घंटा तर नाही ना देत आहेत...


थांबलो होतो मी काही क्षणं
विसाव्याच्या अपेक्षेने
ही वाट चालताना मध्येचं
सावलीच्या जाणिवेने
अरेच्चा ती तर माझीच छाया
होती सांगत जणू मला
राहिली आहेत कुठे वृक्षे
ज्यांच्या सावलीत तू देशील
ह्या जीवा क्षणभरं विसावा
हो आताच सावधं थोडे
घे शिकून तू निसर्गाचे धडे
नको करू तू वृक्षतोड
निसर्गाशी प्रेमाचे नाते तू जोड
जैसी करणी वैसी भरणी
हा नियम ठेव ध्यानी मनी
होशील सुखी मग या जीवनी.


मला राहून राहून सावली या शब्दाचं खूप कुतूहल वाटतं.
"सावली" हा शब्दचं किती विसावा देतो नाही या मनाला.
कारण

सा' म्हणजे साक्षात परमेश्वर
व' म्हणजे त्याचा वरदहस्त,आशीर्वाद आणि
ली' म्हणजे लीन होणे,नतमस्तक होणे..
मग ही सावली वृक्षांची असो वा वडीलधाऱ्या माणसांची असो ती तुम्हाला नक्कीच एक आल्हाददायक अशी मायेची ऊब देत राहते.

अश्या वृक्षांच्या सावलीत जेंव्हा आपण विसावतो तेंव्हा साक्षात परमेश्वराच्या पुढे आपण नतमस्तक झाल्यावर जसा आशीर्वाद आपण अनुभवतो तसाच आशीर्वादरुपी अनुभव आपल्याला वृक्षांच्या छायेत मिळतो...

वृक्षतोड केल्याने जर आपण या मायेच्या सावलीलाच पारखे होत असू तर मग काय उपयोग आपल्या अश्या वागण्याचा.
हे वृक्ष काय किंवा ही वडीलधारी माणसे काय आपण जपायला नकोत?
नक्कीच विचार करण्या सारखी गोष्ट आहे,
नाही का?


लावावीत वृक्ष...
जगवावीत वृक्ष...
जपावित वृक्ष...
फुलवावित वृक्ष...


डॉ अमित.

24 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad