Bluepadजगावेगळं व्हायचे असेल तर........ जगा वेगळं.
Bluepad

जगावेगळं व्हायचे असेल तर........ जगा वेगळं.

डॉ अमित.
डॉ अमित.
12th Sep, 2020

Share

जगावेगळं व्हायचे असेल तर........ जगा वेगळं. अश्यातच एक सुंदर शब्दांचा नाद मनावर उमटला गेला....हो मी याला शब्दांचा "नाद" असेच म्हणेन कारण शब्दांचाही सुर असतो.. शब्दांनाही असतो विशिष्ट नाद जीव जडला ज्याचा शब्दांवर त्याला लागतो पहा शब्दांचा नाद म्हणजे असे की एक छानं शब्दं रचना वाचण्यात आली..नव्हे जिने काळजातच घर केले ती अशी, जगावेगळं व्हायचे असेल तर... जगा वेगळं... किती सुंदर आहे ना? वाचताचं या शब्दांनी मनावर गारूड केलं... रोज सकाळी सूर्य उगवतो...आपला रोजचा दिवस सुरू होतो...रात्र होते...आणि हा दिवस मग दुसऱ्या दिवसाच्या प्रतीक्षेत रात्रीच्या कुशीत गाढ झोपी जातो.पण कधी कधी आपल्याला या सर्वाचा अगदी उबग येतो..वाटू लागतं काहीतरी वेगळं करावं...काहीतरी रोमांचित व्हावं...काहीतरी वेगळं जगावं. नेमेचि उगवतो दिस हा.. नेमेचि च अंधारते रात्र झंकारतो कधी तरी जीव हा जगण्या जीवनात नवे पात्र.... हे असे वाटणे बऱ्याच वेळा..." वाटाण्याच्या अक्षता लावाव्यात"....त्याप्रमाणे फक्त वाटण्या"पुरत्याच मर्यादित राहातं... पण जर आपण जगण्यात एक वेगळी ऊर्मी दाखवली,शरीरात असलेल्या गर्मी"म्हणजे जोश चा योग्य प्रकारे उपयोग केला तर हे बिल्कुल अशक्य नाही. प्रवाहाच्या दिशेने तर सारेच पोहोतात मात्र जो प्रवाहा विरूध्द जावून आपले कौशल्य दाखवतो...आपले कसब पणाला लावतो तो जीवनात नक्कीच काहीतरी वेगळं दैदिप्यमान असे करून दाखवू शकतो... तुम्हाला वाटेल असे जगा वेगळं होणं आणि जगावेगळं जगणं प्रत्येकालाच थोडी ना जमते? हो हे ही तितकेच 'सत्य' आहे पण ते "अर्धसत्य"... कारण आपल्या प्रत्येकात काहीतरी वेगळेपणं दडलेले असते...गरज आहे ते आपल्यातले वेगळेपणं जाणण्याची...जपण्याची आणि त्या वेगळेपणाला प्रोत्साहन देवून स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण करण्याची... नेहमीच इतर कोणासारखे होण्यात आपली शक्ती, क्रियाशीलता व्यर्थ करण्यापेक्षा आपल्यातले वेगळेपण खुलवून स्वतःला या जगा समोर वेगळ्या रूपात प्रदर्शित करणे कधीही बेहत्तर... मी चुकलो असेल लाख धडपडलो ही असेल कितीदा पंख फडफडून नव्या दमाने घेईन मी उंच भरारी अनेकदा... ही जिद्द,हा आत्मविश्वास जर तुम्ही तुमच्यात भिनवला तर जगावेगळं जगणं नक्कीच अशक्य नाही...आणि हेच जगा वेगळं जगणं तुम्हाला तुमची प्रतिमा जगावेगळी करण्यात मोलाची मदत करेल.. " लक्ष्य" चित्रपटाच्या एका गीतात ऋत्विक रोशन शान च्या 'शानदार' आवाजात आपल्या प्रेक्षकांना विचारत असतो ... मैं ऐसा क्यूँ हूँ... मैं जैसा हूँ, मैं वैसा क्यों हूँ करना है क्या मुझको, ये मैने कब है जाना लगता है गाऊँगा, ज़िंदगी भर बस ये गाना होगा जाने मेरा अब क्या कोई तो बताए मुझे गड़बड़ है ये सब क्या कोई समझाए मुझे मैं ऐसा क्यूँ हूँ… मैं जैसा हूँ, मैं वैसा क्यों हूँ..... हे असे स्वतः बद्दल विचारण्या पेक्षा या गीतातला दडलेला अर्थ शोधून स्वतः मधले वेगळेपण दूनियेसमोर सिद्ध करून आपले जगावेगळं होण्याचं लक्ष्य आपण पूर्ण करणे मला खूप खूप रोमांचित करतं.. मला वाटतं तुम्हालाही आवडेल असे दिलखुलासं जगणे...जे तुम्हाला तुम्ही खऱ्या अर्थाने जीवंत असल्याचा साक्षात्कार करत राहील.... तुम्हाला जगा वेगळं सिद्ध करत राहील.. .......हो की नाही? डॉ अमित.

26 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad