Bluepadमुड मुड के तू देखं .....मुड मुड के.
Bluepad

मुड मुड के तू देखं .....मुड मुड के.

डॉ अमित.
डॉ अमित.
11th Sep, 2020

Share

मुड मुड के तू देखं .....मुड मुड के... तुम्हाला माहिती आहे का?एखाद्या गोष्टी कडे आपण वळून वळून किंवा पुन्हा पुन्हा केंव्हा बघतो?? तुम्ही म्हणाल हा कसला प्रश्न आहे?थोडा विचार करा आणि मग सांगा मला? तस सोपं आहे अगदी उत्तर... जर ती गोष्ट आपल्याला मनापासून आवडली तर...हो ना?हे तर अगदीच बाळबोध असे होते...नव्हे का? पण असेच आपण आपल्या स्वतःकडे किंवा आपल्या या सुंदर आवडत्या आयुष्याकडे कधी बघतो का वळून?याचा अर्थ असा नाही होत की तुम्ही नेहमी भूतकाळा चा विचार करावा किंवा घडलेल्या गोष्टींचाच विचार करावा.... तर याचा अर्थ इतकाच आहे की तुम्ही थोडं वळून तुमच्या अंतरंगात डोकावून बघावं...जेंव्हा तुम्ही तुमच्या आत... डोकावतं असता तेंव्हा तुम्ही तुमचे स्वतःचे अवलोकन करीत असता.असे अधून मधून स्व अवलोकन खरेच गरजेचे असते.ते तुम्हाला तुमच्यात आवश्यक असलेल्या काही सुधारणा करण्यास आणि अनावश्यक असलेल्या तुमच्यातल्या काहीं गोष्टी तुमच्यापासून दूर करण्यास मदत करते. असे म्हणतात ना की दगडाची मूर्ती तेंव्हाच सुबक आणि सुंदर होते जेंव्हा त्या दगडातला अनावश्यक असलेला काही भाग मूर्तिकार काढून टाकतो. आपण प्रत्येक जण या ईश्वराची सुबक अशी कलाकृती आहोत.पण आपण आपल्या काही सवयी मुळे या कलाकृतीवर अपेक्षेचे,स्वार्थाचे, तिरस्काराचे काही थर जमा केले नि ईश्वराच्या या सुबक कलाकृतीला मलीन केले. रोज सुबह उठके जब आईनां देखता हूं मैं मुझे उसमे तेरी हलकीसी छबी़ नजर आती हैं.. हो...अगदी खरं आहे..आपल्या प्रत्येकात ईश्वरं वसलेला आहे...सकाळचे आपले प्रतिबिंब हे त्याच्या अस्तित्वाचे विलोभनीय रूपं असते असे मला वाटते. जैसे जैसे दिन ढलता जाता है.... ख्वाईशे अकसर चेहरे पर नकाब बना लेती है. म्हणूनच तुम्हाला स्वतःची खरी ओळख जर करून घ्यायची असेल तर रोज सकाळी तुम्ही स्वतःला उठल्यानंतर आरश्यात न्याहाळले पाहिजे.हे तुमचे निरागस रूप तुम्हाला दिवसभर सकारात्मक आणि उत्साही ठेवेल. चुकलो असेन मी मात्र शिकलोही खूप जीवनात रोजचाच दिवस नव्या दमाने पुन्हा येतो पुढ्यात पूर्ण दिवसभरात आपले भावही बदलत राहत असतात ( मनातले विचार बद्दल बोलतोय मी 😂😂)...कधी ते विशुद्ध असतात,कधी शुध्द, तर कधी अशुध्द.हे बदललेले मनातले भाव देखील आपल्या दैनंदिन जीवनात खूप काही उलथापालथ करीत असतात.जेंव्हा आपण आपल्या अंतरंगात डोकावतो तेंव्हा तुम्हाला याची कल्पना येते...मग आपोआपच आपले आपल्या भावनांवर नियंत्रण येते.आपले मन नकळत आपल्या मर्जीत येते. असे म्हटले जाते चेहरा हा मनाचा आरसा आहे.जेंव्हा तुमच्या मनात विशुध्दं असे भाव येतात...नकळत तुमचा चेहरा देखील खुलतो...आणि हा खुललेला चेहरा बरेचं काही चांगले बदल तुमच्यात घडवून आणतो....तुमच्या संपर्कात येणारी हर एक व्यक्ती त्यामुळे हरखून जाते.हाच सकारात्मक बदल तुमचे अवघे जीवन सफल होण्यास नक्कीच मदत करते.. तेंव्हा नक्कीच आजपासून आपण आपले जीवन मुड मुड के देख तू ...मुड मुड के असे गुणगुणतं आणि हसतं खेळतं जगण्याचा प्रयत्न आपण प्रत्येक जण करूयात..हो की नाही? डॉ अमित.

26 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad