Bluepadहुंदका
Bluepad

हुंदका

सतीश लोंढे
सतीश लोंढे
10th Sep, 2020

Share


आईच्या पदराला धरुन मोठे होणारे आम्ही
त्याच्या उबदार स्पर्शाने आलेली असंख्य आव्हान पेलतो

पण लहानाचे मोठे होत असताना तिच्या हातावर
आलेल्या सुरकुत्या ने मनात काहूर माजत..

ति झुकलेली असते वार्धक्याकड़े ,केसा मधून एका बटाची दूसरी बट होत असते पांढ़री शुभ्र..

घराचा डोलारा उभा करताना तिने स्वतः ची काळजी घेताना केलेली हेळसांड मन सैर भैर करते..

पण त्रासा मागुन त्रास ,संताप ,मनस्ताप , डोक बधीर होत जात,
तिने तर शप्पथ खाल्ली आहे, निमुट पने सहन करण्याची ...

एक दिवस सर्व बंधनातून ति मोकळी होते,
आणि मि तिच्या निर्जीव देहाकडे बघून जीवाच्या आकांताने देतो तो हुंदका ,तोहि तिला कधीच ऐकू जात नाही..

ती निशब्द मी निशब्द
शेवटचे राहतात फ़क्त शब्द आई.... आई...

✍️✍️
सतीश लोंढे

15 

Share


सतीश लोंढे
Written by
सतीश लोंढे

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad