Bluepadकरन्सी एक्सचेंज....थोडे आगळे थोडे वेगळे.
Bluepad

करन्सी एक्सचेंज....थोडे आगळे थोडे वेगळे.

डॉ अमित.
डॉ अमित.
9th Sep, 2020

Share

करन्सी एक्सचेंज....थोडे आगळे थोडे वेगळे. थोडंसं हटके वाटतंय ना शीर्षक वाचल्यावर? हो ना?तुमच्या मनात असा तर विचार येत नाही ना की इथे आमचे या कोरोना मुळे घरातून बाहेर पडणे अवघड झाले आहे आणि मी करन्सी एक्सचेंज करून तूम्हाला कुठे पाठवतो आहे?किंवा असे तर नाही ना वाटतं की मी लॉक डाऊन मुळे वैतागून नवीन काही व्यवसाय वगैरे सुरू केला आणि त्याचीच ही जाहिरात या लेखातून करतोय??😃😃😃 असो तसे काहीच नाही ...उगाच तुमचा भ्रमनिरास केला.😅😅(करतो कधी कधी मी असे बरका😂😂) या लेखाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक छान अशी गोष्ट सांगणार आहे तेंव्हा कुठे तुम्हाला मला काय सांगायचे आहे हे कळेल.. एक खूप खूप धनाढ्य बिसनेसमन असतो...खूप खूप पैसा असतो त्याच्याकडे. पण त्या पैशांचा त्याला खूप घमंड देखील असतो...तो एकदा गाडीतून जाताना रेडिओ वर एक थोर संत उपदेश देत असतात.त्यांच्या बोलण्यामध्ये असे येते की तुम्ही खूप पैसा पैसा करू नका...कारण तो कोणीच मेल्यानंतर आपल्या सोबत घेऊन जाऊ शकत नाही असा काही त्यांच्या सांगण्याचा रोख असतो.त्यावेळी तो बिसनेसमन त्या साधूची थट्टा करतो...तो म्हणतो या साधूला,ज्याच्या जवळ काहीच पैसा नाही त्याला काय कळणार पैसा किती महत्वाचा असतो ते... पण त्या दिवसापासून त्याच्या डोक्यात एकच विचार येऊ लागतो की मी माझा सर्व पैसा मेल्यानंतरही सोबत कसे घेऊन जाऊ शकतो? तो आपल्या कंपनी च्या सर्व सल्लागारांना एकत्र बोलावून त्यांना आपल्याला यावर काही उपाय सुचवायला सांगतो...त्याचे सर्व सल्लागार आणि कंपनी चे इतर कर्मचारी त्याची त्याच्या मागे थट्टा करायला लागतात.बहुतेक आपल्या मालकाला वेड लागले आहे असे ते समजतात... असेच काही दिवस जातात...त्याच्या ऑफिस मध्ये एक सद्गृहस्थ येतात आणि त्याला सांगतात की त्याच्या कडे त्याच्या समस्येचा उपाय आहे...तो बिसनेसमन खूप आनंदी होतो हे ऐकुन. ते सद्गृहस्थ त्यांना विचारतात की तुम्ही विदेश दौरे केले आहेत का?तो म्हणतो की हो मी जवळ जवळ सर्व देश फिरलो आहे.तेंव्हा तो त्यांना विचारतो की तुम्ही त्या देशात जाण्यापूर्वी पैशाचे काय करता?तो सांगतो की मी आपले भारतीय रुपये मला लागणार असतील तितके त्या देशाच्या करन्सी मध्ये एक्सचेंज करून घेतो....कारण त्या त्या देशात तिथलीच करन्सी वापरता येते... तेंव्हा तो सद्गृहस्थ म्हणतो अगदी हेच तुम्ही करू शकता...तुम्ही मेल्यानंतर स्वर्गात जावू इच्छिता आणि तेही तुमचे इथले सर्व पैसे घेवून?तो म्हणतो हो...तर मग तुम्हाला इथली करन्सी तिथे कशी चालेल?...त्याला तुम्हाला "करन्सी एक्सचेंज" करून तिथल्या करन्सी मध्येच न्यावे लागेल... आणि तिथली करन्सी आहे "पुण्य...." जे तुम्हाला इथेच तुमच्या इथल्या करन्सी चा उपयोग करून कमवायचे आहे...आणि ते तुम्ही इथे तुमच्या अमाप संपत्तीने अवश्य कमावू शकता हो की नाही?त्या बिसनेसमन ला त्याचा हा उपाय खूप खूप आवडतो....आणि तेंव्हापासून तो आपल्या संपत्तीचा घमंड न करता समाजसेवेसाठी त्याचा उपयोग करतो..आणि जमेल तसे पुण्य तो कमावतो. तशी गोष्ट खूप साधी पण नक्कीच विचार करायला लावणारी अशी आहे... आपण आयुष्यभर पैसा पैसा करत राहतो....पण त्याचा योग्य उपयोग आपण करायचे राहून जातो....मग तो स्वतः साठी असो वा इतरांसाठी असो...बऱ्याच वेळा पैसा जवळ असून मन मारून जगतो किंवा फक्त तो साठवत राहण्याच्या मागे लागतो... पैसा...ज्याला इंग्रजी मध्ये मनी.. MONEY असे म्हणतात ..या "मनी" ची मी माझ्या मनाने अशी विकल केलेली "मनी'ला मनापासून आवडेल.😄😄 M...मेक राईट यूज ऑफ इट म्हणजे तुम्ही तुमच्या पैशांचा योग्य उपयोग करा. O...Owe...to the society...ओ..टू द सोसायटी. म्हणजे तुम्ही ज्या समाजात राहता त्या समाजाचे देखील तुम्ही काही देणे लागता हे कायम स्मरणात ठेवून तुम्ही तुमच्या पैशांचा समाज कल्याणासाठी देखील उपयोग करू शकता. N... नेव्हर मिस यूज इट म्हणजे आपल्या पैशांचा वाईट कामात कधीच उपयोग करू नका. E...Earn it by the right way..अर्न इट बाय द राईट वे योग्य मार्गाने, कष्टाने आणि मेहनतीनेच तो कमवा Y....Yield Should be always gilled.. म्हणजे तुमचे उत्पन्न हे नेहमी प्रवाहीत राहिले पाहिजे...म्हणजे पैसा हा नुसता बँकेतल्या किंवा कपाटातल्या तिजोरीत पडून न राहता तो नेहमी कोणाच्या ना कोणाच्या उपयोगी पडून सदा प्रवाहीत राहिला हवा....तरच पैश्याच्या रूपातील लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील... तेंव्हा मला नक्की सांगा तुम्ही इच्छुक आहात का हे आगळे वेगळे करन्सी एक्सचेंज करायला....मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडेल ते...हो की नाही? डॉ अमित.

37 

Share


डॉ अमित.
Written by
डॉ अमित.

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad