Bluepadवात्सल्य मूर्ती.. आई
Bluepad

वात्सल्य मूर्ती.. आई

ऋतुजा चव्हाण..
9th Sep, 2020

Share

आईला मुलाला मोठे होताना पहायचं होत डोळ्यातील आसवांना तिला पुसायच होत मनातील आठवणींना जागवायचं होत लहानपणीच्या मुलाला डोळे भरून पहायचं होतं करायचा होता तिला त्याग मातृभूमीच्या खातर परंतू मनातील हुंदक्याला कसा घालणार ती आवर नितांत प्रेम असणाऱ्या मुलाला लोटू शकेल का ती दूर देशसेवेसाठी तिला करावे लागेल मुलास अर्पण भारतमातेची ही कन्या घडवेल पुत्ररत्न कर्तृत्ववान भारताचे ते करतील रक्षण कीर्तीचा दरवळ पसरेल सर्वदूर तिरंग्यालाही येईल नवचैतन्य कोरोनाच्या या युद्धात लढतील भूमिपुत्र शेजारपाजारचा शत्रूना ही येईल ऊत कणखर बाणा असलेली ही भूमी पावन होईल भूमिपुत्रांच्या कार्याने आईच्या वात्सल्याने प्रेमाला ही येईल भरती क्षणभंगुर या जीवनाची होईल सरती क्षितिजावर ही होईल जल्लोष शेवटी सरशी होईल आईच्या विवेकाची

25 

Share


Written by
ऋतुजा चव्हाण..

Comments

SignIn to post a comment

Recommended blogs for you

Bluepad